न्यायालय इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण..
डोंगरचा राजा / आँनलाईन
व्यवस्थेचा गाडा चालवताना राजकीय हस्तक्षेप नको — न्यायमूर्ती शिंदे
ग्रामीण भागात अर्थकारण कमी असते त्यामुळे त्याचा परिणाम सर्व सिस्टम वर होतो. मी होळ तालुका केज चा रहिवासी आहे. ग्रामीण भागातून काम करत पुढे जाताना किती अडथळे येतात याची जाणीव मला आहे. मात्र न्यायव्यवस्थेचा गाडा चालवताना त्यात राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप झाला नाही पाहिजे तरच जनतेचा विश्वास राहील.असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संभाजी शिंदे यांनी केले.
वडवणी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचा कोनशिला अनावरण प्रसंगी शिंदे बोलत होते.बीडचे पालक न्यायमूर्ती रवींद्र घुगे,मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विश्वास जाधव,मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा बीडचे पालक न्यायमूर्ती सोपान जाधव, वडवणीचे न्यायाधीश कैलास चापले, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य वसंत सोळंके उपस्थित होते. अध्यक्षस्थानी बीड जिल्हा सत्र न्यायाधीश प्राची कुलकर्णी उपस्थित होत्या. पुढे बोलतांना न्यायमूर्ती शिंदे म्हणाले की न्यायव्यवस्था चालण्यासाठी दहा लाख लोकसंख्येच्या मागे 50 न्यायाधीश असावेत ती संख्या भारतात कमी आहे.ऑस्ट्रेलियात व अमेरिकेत जास्त असून काम करत असताना पक्षकाराला समाधान होईल असेच काम करा. फिस वाजवी घ्यावी.जेणेकरून तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगला होईल.न्यायाची वाट पाहणां-यासाठीच न्यायालये आहेत. आपले काम करत असताना सामाजिक कार्य ही करा यामध्ये बार आणि बेंच चे काम चांगले पाहिजे. न्यायालयाची इमारत एक वर्षात होणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.