Home » माझा बीड जिल्हा » वांजरा फाटा येथे  आरक्षणासाठी  रास्ता रोको.

वांजरा फाटा येथे  आरक्षणासाठी  रास्ता रोको.

वांजरा फाटा येथे  आरक्षणासाठी  रास्ता रोको.
-वाहनाच्या लांबच लांब रांघाने वाहतूक ठप्प
अमोल जोशी डोंगरचा राजा ऑनलाइन 
राज्यात सध्या सुरु असलेल्या मराठा आरक्षण  आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ,आज रविवारी सकाळी १० वाजता बीड-नगर जाणाऱ्या महामार्गावर पाटोदा तालुक्यातील  वांजरा फाटा येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले,
यावेळी हजारो मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.
नौकरीतील मेगा भरती रद्द करा,व आरक्षण लवकर जाहीर करा या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला .
एक तासाच्या रस्तारोकोने या महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प होऊन वाहनाच्या लांबच लांबच रांगा लागल्या होत्या.कुसलंब ,सौतडा, येवलवाडी, वानेवाड़ी, मुगगाव या गावासह अनेक गावतुन लोक सहभागी होते.
मोर्चेकऱ्यांचे निवेदन तहसीलदार रूपा चित्रक यांनी स्वीकारले. पोलीस निरीक्षक माने एस.जे.व कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता  .

Leave a Reply

Your email address will not be published.