Home » देश-विदेश » बस दरीत कोसळली, ३३ जणांचा मृत्यू

बस दरीत कोसळली, ३३ जणांचा मृत्यू

बस दरीत कोसळली, ३३ जणांचा मृत्यू 

डोंगरचा राजा / ऑनलाईन

  • कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळली, ३३ जणांचा मृत्यू
  • बसमध्ये दापोली कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते,
  • ८ मृतदेह बाहेर काढल्याची माहिती समोर आली आहे.

रायगड पोलादपूरच्या घाटात दापोली कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळली आहे, या बसमध्ये  एकूण ड्रायव्हरसह ३४ जण होते.  या ३४ जणांपैकी ३३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती शिवसेना आमदार भारत गोगावले यांनी दिली. हे सगळे कर्मचारी प्रामुख्याने दापोलीचे होते. दापोलीवर या अपघातामुळे शोककळा पसरली आहे. ३४ पैकी एका प्रवाशाने बस कोसळत असताना उडी मारली त्यामुळे त्याचा प्राण वाचला. प्रकाश देसाई असे त्यांचे नाव आहे. बस कोसळत असताना त्यांनी या बसमधून उडी मारली. त्यानंतर कसेबसे बाहेर येऊन त्याने अपघात झाल्याचे विद्यापीठात कळवले. या बसचा चेंदामेंदा झाला.  बस सकाळी १०.३० च्या दरम्यान दरीत कोसळली बस सुमारे २०० ते ३०० फूट खोल कोसळली. हा घाट अत्यंत बिकट आहे. जिथे हा अपघात झाला ते ठिकाण अपघाताचे नाही, त्यामुळे नेमका अपघात कसा झाला ते समजू शकलेले नाही. बस जेव्हा कोसळली तेव्हा अनेकजण फेकले गेले आणि झाडांमध्ये अडकले असेही स्थानिकांनी म्हटले आहे. प्रकाश सावंत असे बचावलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. हा कर्मचारी सध्या काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही.

३४ कर्मचारी घेऊन महाबळेश्वरच्या दिशेने बस निघाली होती. कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भातली माहिती दिली. तसेच सकाळपासून या दिशेने बचाव पथके रवाना झाली आहेत. ३३ जणांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे अशीही माहिती स्थानिक आमदार गोगावले यांनी दिली. महाबळेश्वरला पर्यटनासाठी निघालेल्या दापोली कृषी  विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांची मिनी बस प्रतापगड घाटात सकाळी कोसळली.

शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात किरे खिंडीत मिनी बस खोल दरीत कोसळली. या घटनेची पोलादपूर व महाबळेश्वर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आता याठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

आज सकाळी पिकनिकला निघालेले कर्मचारी

 दरवर्षीच दापोली कृषी विद्यापीठाची पावसाळी सहल जाते तशी ती या वर्षीही निघाली. सकाळी साडेसहाच्या सुमारास हे सगळे कर्मचारी पिकनिकसाठी निघाले. या बसमध्ये एकही महिला नव्हती. सकाळी १०.३० च्या सुमारास एका कर्मचाऱ्याने विद्यापीठात बसला अपघात झाला आहे असे कळवले. तर NDRF चे पथकही या ठिकाणी रवाना झाले आहे. बचावकार्य सुरू असल्याने पोलादपूर घाटात वाहतूक थांबवण्यात आली आहे. त्यामुळे घाटात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

 ग्रामस्थांनी बस दरीत कोसळल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलादपूर आणि साताऱ्यातील सर्वच यंत्रणांनी धाव घेतली. महाबळेश्वर येथील ट्रेकर्सही बचाव कार्यात सहभागी झाले आहेत. मुसळधार पाऊस पडत असतानाही बघ्यांनी गर्दी केली होती. पोलिसांनी कूमक कमी असल्याने गर्दीला आवर घालणे कठीण होऊन बसले होते. आता हे बचाव कार्य सुरू असून एकूण ८ ते १० मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.

मृतांची नावे

 सुनील कदम

 निलेश तांबे

 सुयश बाळ

 संदीप झगडे

 प्रशांत भांबेड(ड्रायव्हर)

 राजू रिसबूड

 रत्नाकर पागडे

 प्रमोद जाधव

 संदीप सुर्वे

 प्रमोद शिगवण

 संदीप भोसले

 जयंत चौगुले

 राजू बंडबे

 संतोष जळगांवकर

 सुनील साठले

 रवीकिरण साळवी

 सचिन झगडे

 संजीव झगडे

 राजाराम गावडे

 पंकज कदम

 सचिन गिम्हवणेकर

 रितेश जाधव

 हेमंत सुर्वे

राजेश सावंत

 रोशन तबीब

 किशोर चौगुले

 विकास शिंदे

 संदीप सुवरे

 सावंत(फोंडाघाट रिसर्च स्टेशन)

Leave a Reply

Your email address will not be published.