Home » माझी वडवणी » धनगर समाज पुन्हा लढा उभारणार..

धनगर समाज पुन्हा लढा उभारणार..

धनगर समाज पुन्हा लढा उभारणार..

डोंगरचा राजा / ऑनलाईन

— धनगड जात दाखवा अन्यथा धनगर समाजाला आरक्षण द्या-पडळकर

वडवणी– महाराष्ट्रात धनगड जात दाखवा अन्यथा धनगर समाजाला आरक्षण द्या यासाठी धनगर समाज पुन्हा आरक्षण लढा द्या लागेल असे मत धनगर समाजाचा बुंलद आवाज गोपिचंद पडळकर यांनी व्यक्त केले ते वडवणी येथिल नगरपंचायत समोरील बचट गट भवन येथिल सभागृहात विचारमंथन मेळाव्यात बोलत होते
यावेळी बोलताना ते म्हणाले की राज्यामध्ये एकही धनगड जातीचा माणूस नाही याबाबत आम्ही तहसीलदार ,प्रांत अधिकारी जातपडताळणी कार्यालयामध्ये कसून चौकशी केली असता त्यांनी धनगड जातीचे एकही प्रमाणपत्र दिले नसल्याचे सांगितले आहे पुढे ते म्हणाले की महाराष्ट्रात धनगड ही जात असल्याची चुकीची माहिती देत आहेत ती व्यक्ती कोठे आहे हे त्यांनी सांगावे त्याचा शोध आम्ही घेऊ अधिका-यांनी चुकीची माहिती देऊ नये असा इशारा गोपिचंद पडळकर यांनी दिला मुंख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते ते आरक्षण कसे द्यायचे आहे ते आम्ही राज्य सरकारला सांगू 1 ऑगस्ट रोजी होणा-या मेळाव्यात राज्य शासनाला शंभर दिवसाचे अल्टीमेट देणार असून आता आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे सांगत या मेळाव्यास धनगर समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यचे आवाहन गोपिचंद पडळकर यांनी केले यावेळी बोलताना उत्तमराव जानकर म्हणाले की सामाजिक न्याय मंत्री विष्णू सावरा यांच्यामुळे धनगर समाजाचे आरक्षण रखडले आहे धनगर समाजाला आरक्षण प्रश्नी अभ्यासंपुर्ण लढा उभारला जात असून शासनाने धनगर समाजाच्या भावनांशी खेळू नये अन्यथा त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा जानकर यांनी दिला प्रास्ताविक अँड डोंबाळे यांनी केले यावेळी वडवणी तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीचे आयोजन दत्ता वाकसे यांनी केले होते

Leave a Reply

Your email address will not be published.