Home » माझी वडवणी » वडवणीत ठाकरे वाढदिवसानिमित विविध उपक्रम

वडवणीत ठाकरे वाढदिवसानिमित विविध उपक्रम

वडवणीत ठाकरे वाढदिवसानिमित विविध उपक्रम

डोंगरचा राजा / ऑनलाईन

  • वडवणीत उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध उपक्रम

तासभरात पन्नास शिवसैनिकांचे रक्तदान

 

 

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित शिवसेनेचे वडवणी तालुका प्रमुख विनायक मुळे सह शिवसैनिकांच्या वतीने आज शुक्रवार दिनांक २७ जुलै रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी रक्तदान शिबीरात ६५ शिवसैनिकांनी रक्तदान केले आणखी आकडा वाढतच होता.

तालुका शिवसेनेच्या वतीने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वडवणी शहरात असलेल्या डाॅ. पुर्भे यांच्या अश्विनी हाॅस्पीटल येथे सकाळी ११ वा रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हनुन बीड जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती मा.युद्धाजीत पंडीत तसेच प्रमूख पाहूने डाॅ.पुर्भे सर, आर पी आयचे तालूका अध्यक्ष महादेव उजगरे, शहरप्रमुख नागेश डिगे, नगरपंचायत सभापती कचरु जाधव, यूवासेना तालूका अधिकारी बाळासाहेब लोकरे,प्रमिलाताई माळी, माऊली गोंडे, बंडुमामा जाधव, रामदास ढगे,सर्जेराव जोगदंड,संजय धपाटे,भैय्यासाहेब खोसे, युवराज शिंदे, मसुराम गोंडे, वचीष्ट शेंडगे,महेश जाधव,गोविंद शिंदे, ओमराजे जाधव नरेंद्र राठोड, बालासाहेब बादाडे, सचीन धपाटे, अनिल मस्के नवनाथ मोरे,पप्पु निपटे, उपस्थित होते. या रक्तदान शिबीरात एक तासभरातच ६५ शिवसैनिकांनी रक्तदात्यानी रक्तदान दिले तरी आणखी आकडा वाढतच होता. यासह तालुक्यात विविध कार्यक्रम पार पडले यामध्ये रुग्णालयातील रुग्णांना खाऊ व फळाचे वाटप ,वृक्षारोपण, शालेय साहीत्य वाटप आदी कार्यक्रम सपन्न झाले.या सर्व कार्यक्रमास शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी,शिवसैनिक व नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.