वडवणीत १०५ रक्तदात्यांनी केले रक्तदान.
डोंगरचा राजा / आनलाईन
वडवणी शहरात बंजारा समाज बांधवांच्या वतीने आयोजित स्वर्गीय वसंतराव नाईक जयंती निमित्त नुकताच रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेण्यात झाला. या रक्तदान शिबिरा मध्ये तब्बल 105 रक्तदात्यांनी रक्तदान केले.बंजारा समाज बांधवांच्या वतीने त्यांना लागलीच प्रमाणपत्राचे वाटपही करण्यात आले.
वडवणी शहरामध्ये यावर्षी बंजारा समाज बांधवांच्या वतीने बंजारा समाजाचे सर्वेसर्वा हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून गेल्या आठवडाभरापासून बंजारा समाजातील युवक बांधवांनी मोठी तयारी केली आहे. आज वडवणी शहरांमधील बचत गट भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आहे घेण्यात आला. या शिबिरामध्ये नुकतेच बंजारा समाजाच्या वरिष्ठ नेत्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी तालुक्यातील शेकडो बंजारा युवक या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झाले होते. प्रथमतः हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व नंतर रक्तदान शिबिरास सुरुवात झाली. यावेळी तालुका भरातून आलेल्या 105 रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी उपस्थित झालेल्या सर्व रक्तदात्यांचे आणि प्रमुख अतिथींचे स्वागत व आभार जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले. तसेच बंजारा युवकांनी या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून पुढील कार्यक्रमासाठी तमाम समाज बांधवांनी सहभागी होण्याबरोबरच मिरवणुकीचा कार्यक्रमाचा ही लाभ घेण्याचे आवाहन जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.