Home » माझी वडवणी » वडवणीतील मराठा क्रांती ठोक मोर्चास..

वडवणीतील मराठा क्रांती ठोक मोर्चास..

वडवणीतील मराठा क्रांती ठोक मोर्चास..
डोंगरचा राजा / आँनलाईन.
— वडवणीतील मराठा क्रांती ठोक मोर्चास  ऊपस्थीत रहा : सकल मराठा
— मोर्चा शांततेत होणार .
मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नसल्याने संतप्त झालेल्या वडवणी तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने वडवणी येथील तहसील कार्यालयावर गुरुवार दि २६ रोजी मराठा क्रांती ठोक मोर्चा काडुन ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी बचत गट भवन येथे सकाळी १० वाजता हाजर व्हावे हा मोर्चा डॉ बाबासाहेब अंबेडकर चौक वसंतराव नाईक चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक, मार्गे तहसिल कार्यालयावर जाऊन ठिय्या आंदोलन करणार आहेत मोर्चा शांततेत होणार आसल्याचे मत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.
    गेली आठ दिवस झाले परळी येथे सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी व मराठा समाजाच्या इतर मागण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरू आहे. या समाज बांधवांना पाठींबा  देण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला खोटी आश्वासन देत नुसत झुलवत ठेवण्याचे काम केले आहे. सध्या गेंड्याची कातडी पांगारलेल्या शासनाला धारे वर धरण्यासाठी मराठा  समाजाच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका करत.मराठा समाजाची सरकारने दिशाभूल करुन आरक्षणाचा मुद्दा रेंगाळत ठेवल्याचा आरोप करीत सरकारच्या धोरणांवर आक्षेप घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण तात्काळ देऊन विविध प्रश्न सोडवण्यासाठी ऊद्या गुरुवारी २६ जुलै रोजी  वडवणी तहसील कार्यालयावर मराठा ठोक मोर्चा काढुन ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. सरकारला धारेवर धरण्यासाठी हा मोर्चा ना भुतो ना भविष्य करण्यासाठी वडवणी तालुक्यातील प्रत्येक गावातील हजारो मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत. या मोर्चात सर्व समाज बांधवांनी बचत गट भवन येथे सकाळी १० वाजता हाजर व्हावे हा मोर्चा डॉ बाबासाहेब अंबेडकर चौक वसंतराव नाईक चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक, मार्गे तहसिल कार्यालयावर जाऊन ठिय्या आंदोलन करणार आहेत. तर मोर्चास हजारोंच्या संख्येने  सहभागी होण्यासाठी अवाहन करण्यात आले आहे. तर या मोर्चाला कसल्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची दक्षता वडवणी सकल मराठा मोर्चाच्या वतीने सर्वांना सांगण्यात आले आहे.
गावोगावी बैठका
ऊद्या गुरुवार २६ जुलै रोजी वडवणी तहसील कार्यालयावर  होणारया मराठा क्रांती मोर्चाची तयारी संदर्भात तालुक्यातील गावागावात बैठका घेतल्या आहेत. तालुक्यात साळिंबा, पिंपरखेड, मोरेवाडी, कवडगाव चिंचोटी, राजा हरिश्चंद्र पिंपरी, देवडी, काडीवडगाव, रामनगर, पुसरा, तीगाव, चिंचाळा, देवळा, खडकी, चिखलबीड, सकाळी उपळी, कुप्पा, चिंचवण, सोन्नाखोटा, पिंपळटका तसेच केंडेपिंपरी, धानोरा, देवगाव, परडी, माटेगाव, लवुळ, लोणवळ, हिवरगव्हाण, पुसरा, मोरवड, बाहेगव्हान आदी गावात आयोजक वडवणी तालुका मराठा क्रांती संयोजन समीती नियोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.