वडवणी शहर कडकडीत बंद
डोंगराचा राजा / आँनलाईन.
वडवणी — परळी येथे सुरू असलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समर्थनार्थ माजलगाव येथे रास्ता रोको दरम्यान मराठा बांधवांवर झालेल्या लाठीहल्याच्या निषेधार्थ आज शनिवारी वडवणीत कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी जय जिजाऊ, जय शिवराय या घोषणांनी वडवणी शहर दुमदुमून गेले.
परळीतील मराठा क्रांती ठोक मोर्चातील आंदोलक दोन दिवसांपासून तहसील कार्यालयाला घेराव घालुन आहेत. याचे तीव्र पडसाद सबंध महाराष्ट्रभर उमटले. माजलगाव येथे रास्ता रोको करण्यात आला होता. त्यावेळी हिंसक जमावावर पोलिसांकडून लाठीहल्ला झाला. त्या निषेधार्थ आज वडवणी बंदची हाक देण्यात आली. सकाळी दहा वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन पायी निषेध रॅली काढण्यात आली. याला सर्व व्यापारी वर्गाने शंभर टक्के प्रतीसाद दिला. यावेळी तालुक्यातील सकळ मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.