मुंडन करुन घातला सरकारचा दहावा.
अमोल जोशी / डोंगराचा राजा आँनलाईन
— मराठा आंदोलनकर्त्यानी मुंडन करुण घातला सरकारचा दहावा .
–दुसऱ्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरूच.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पाटोदा तहसीलपुढे गेल्या दोन दिवसापासुन ठिय्या आंदोलन सुरु असुन ,आज आंदोलनस्थळीच् संतप्त आंदोलकानी सरकारचा दहावा घातला ,विधिवत सर्व प्रक्रिया पार पाडून जवळपास 50 मराठा तरुणानी मुंडन करुण सरकारचा निषेध केला. तसेच आज मराठा व्यापाऱ्यानी स्वयस्पुर्तिने आपआपली दुकाने बंद ठेवत ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. दुपारी तहसिलदार रूपा चित्रक यांनी आंदोलनकरत्यांची भेट घेऊन हे आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती केली, मात्र आंदोलक भूमिकेवर ठाम असुन हे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार आहे.