Home » माझा बीड जिल्हा » पाटोद्यात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु..

पाटोद्यात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु..

पाटोद्यात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु..
 अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाइन
— मराठा आरक्षणासाठी पाटोदयात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु.
  -विविध जातीधर्मातील लोकांचा पाठिंबा.
पाटोदा —  मराठा समाजाला आरक्षण दया ,आरक्षण मिळेपर्यंत नोकरभरती स्थगित ठेवा. या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी आज दि 20 शुक्रवार सकाळपासून तहसील कार्यालयसमोर सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले असुन ,मागणी मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे .तुळजापुरातून सुरु असलेल्या या अंदोलनाचे पडसाद परळीत उमटले गेल्या दोन दिवसापासुन परळीत ठोक मोर्चाचे रूपांतर बेमुदत ठिय्या आंदोलनात झाले आहे. या अंदोलनाला पाठिंबा म्हणून आता सर्वत्र मराठा समाज एकवटला असून, सर्वत्र विविध मार्गाने आंदोलन सुरु आहे. पाटोदा शहरात आज सकाळपासुन सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन तहसील कार्यालयासमोर सुरु असुन आरक्षणाची मागणी  मान्य होईपर्यन्त हे आंदोलन सुरूच राहणार आहे. सरकारविरोधी घोषणानी हा परिसर आंदोलनकरत्यांनी दणानून सोडला. या ठिय्या आंदोलनात पाटोदा शहरासह तालुक्यातील विविध गावातून समाजबांधव मोठ्या संखेने उपस्थित आहेत. या आंदोलनाला सर्व  राजकीय पक्षचे कार्यकर्ते, नेते, विविध समाजाचे लोक उपस्तिथ राहून पाठिंबा देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.