Home » माझा बीड जिल्हा » सरकार विरोधी घोषणांचा पाऊस.

सरकार विरोधी घोषणांचा पाऊस.

सरकार विरोधी घोषणांचा पाऊस.
डोंगराचा राजा / आँनलाईन
— नागपूर चा पोपट काय म्हणतय मराठ्यांना आरक्षण नाही म्हणतय..
— वडवणीत सरकार विरोधी घोषणांचा पाऊस.
 वडवणी  —  राज्य सरकारविरोधात मराठा क्रांती मोर्चाने पुन्हा वज्रमूठ आवळली असून ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा देत  वडवणीमध्ये रास्तारोको करण्यात आला.  या सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय’ या घोषणांसह नागपूरचा पोपट काय म्हणतो, मराठ्यांना आरक्षण नाही म्हणतो, अशा जळजळीत घोषणांनी वडवणी शहर दणाणून गेलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात ध्वजारोहण करत हजारो मराठा युवक रस्तारोको मध्ये सामील झाले होते. दरम्यान परळी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पडसाद थेट विधान परिषदेत उमटले असून मराठा आरक्षणावर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते ना.धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला.
   मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसह अन्य मागण्यांसाठी गेल्या वर्षभरापूर्वी राज्यभरातल्या जिल्ह्या जिल्ह्यात लाख-लाख दहा-दहा लाखांचे मूक मोर्चे निघाले. सरकार दरबारी आरक्षणाची मागणी मराठ्यांनी लावून धरली. परंतु राज्यातील भाजप सरकारने मराठ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले. आश्‍वासने देऊन एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिकठिकाणी पुन्हा ठोक मोर्चे काढण्याचे नियोजन होत गेले. ठोक मोर्चाची पहिली ठिणगी ही तुळजापूरमध्ये पडली आणि या ठिणगीचा भडका परळीत झाला. या मोर्चाचे जिल्ह्यातील वडवणी या तालुक्याचे ठिकाणी सुध्दा हजारो मराठा समाज सहभागी होऊन. दुपारीच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्तारोको आंदोलन करुन संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.