Home » माझा बीड जिल्हा » वाढदिवसाची जोरदार तयारी – मुळे

वाढदिवसाची जोरदार तयारी – मुळे

वाढदिवसाची जोरदार तयारी – विनायक मुळे
डोंगराचा राजा /आँनलाईन.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वड़वणी तालुक्यात  जोरदार तयारी. 
वड़वणी — शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त वड़वणी तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन.23 जुलै रोजी वड़वणी ते पोखरी पायी दिड़ीचे आयोजन करण्यात आले असुन दिनांक  27 जुलै रोजी उद्धव यांच्या वाढदिवसानिमित्त आश्विनी हॅस्पीटल मधे भव्य रक्तदान शिबीर होणार आहे. तसेच कस्तुरबा गांधी विद्यालयात वृक्षारोपनाचा कार्यक्रम होणार आहे.तरी वरिल कार्यक्रमास शिवसैनिकांनी मोठ्या संस्थेने उपस्थीत रहाण्याचे आव्हान तालुका प्रमुख विनायक मुळे यांनी केले आहे.
   29 जुलै रोजी बीड़ येथे शिवसेनेचे उपनेते संजय राउत,खा.चंद्रकांत खैरे,संपर्क प्रमुख सुधीर मोरे,माजलगाव विधानसभा प्रमुख सुनील विचारे यांच्या उपस्थीतीत शिवसेनेचा भव्य दिव्य मेळावा होणार आहे. हा मेळावा यशस्वी करण्याकरीता माजी जिल्हा प्रमुख अनिल जगताप, जिल्हा प्रमुख सचिन मुळुक यांच्या आदेशाने व शिवसेना तालुका प्रमुख विनायक मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वड़वणी शहर प्रमुख नागेश ड़िगे,वचिष्ठ शेड़ंगे हे जोरदार तयारी सुरू करित आहेत. या मेळाव्यास वड़वणी तालुक्यातुन मतदार सहभागी व्हावेत याकरिता बंड़ु जाधव,प्रमिला माळी. बाळासाहेब लोकरे. नरेंद्र राठोड. रामदास ढगे. माउली गोड़े. संजय धपाटे. सर्जेराव जोगंदंड़. भय्यासाहेब खोसे. वसंत सावंत. माऊली जाधव. युवराज शिंदे. मुन्ना पवार. प्रताप मात्रे. रतन सवासे. ओमराजे जाधव. मिल्लुबाई पठाण. पप्पु निपटे. बालु बादाड़े. दिनेश जाधव  यांनी संपुर्ण वड़वणी तालुका पिजुन काढत मेळाव्याचे उद्दीष्ट सांगीतले तरी उद्धव ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमास व 29 जुलै रोजीच्या शिवसेना मेळाव्यास माजलगाव मतदारसंघात तमाम जनतेने उपस्थीत रहाण्याचे आव्हान वड़वणी तालुका शिवसेने,युवासेना,किसानसेना,
महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.