Home » माझी वडवणी » चि.जयसेन ला नवोदय परिक्षेत यश.

चि.जयसेन ला नवोदय परिक्षेत यश.

चि.जयसेन ला नवोदय परिक्षेत यश.
डोंगरचा राजा / ऑनलाईन.
वडवणी येथील पत्रकार जानकीराम उजगरे यांचे चिरंजीव जयसेन जानकीराम उजगरे याने नवोदय विद्यालय परीक्षेत यश संपादन केले असून तो नवोदय विद्यालयाच्या प्रवेशास पात्र ठरला आहे. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल अनेकांकडून चि.जयसेन चे अभिनंदन केले जात आहे.
वडवणी येथील पत्रकार जानकीराम उजगरे यांचे चिरंजीव जयसेन उजगरे याने नुकत्याच झालेल्या नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत यश संपादन केले आहे.आत्ताच लागलेल्या निकालावरून तो नवोदय विद्यालयाच्या प्रवेशास पात्र ठरला असल्याची माहिती  नवोदय विद्यालयाच्या प्रवेश समितीकडून कळवण्यात आलीे आहे. चिरंजीव जयसेन हा वडवणी येथील सिंदफणा माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असून त्याने गतवेळी झालेल्या नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत सहभाग घेतला होता. या परीक्षेत त्याने संपादन केले असून नुकत्याच लागलेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या निकालात तो प्रवेशास पात्र ठरला आहे. चिरंजीव जयसेन याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व पत्रकार बांधवांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.