Home » महाराष्ट्र माझा » ह्रदयविकाराने तीन वारकऱ्यांचा मृत्यू.

ह्रदयविकाराने तीन वारकऱ्यांचा मृत्यू.

ह्रदयविकाराने तीन वारकऱ्यांचा मृत्यू.
डोंगराचा राजा/ आँनलाईन
तरडगाव ते फलटण माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होत असताना तीन भाविकांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला.
तरडगाव ते फलटण माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होत असताना तीन भाविकांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली.
तरडगाव ते फलटण माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होत असताना तीन भाविकांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत फलटण शहर पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलुबा तुळशीराम सोलने (वय ६५, रा. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) व सुभाष चंद्रभान गायकवाड (वय ५५, रा. मुकुंदवाडी ता. जि. औरंगाबाद) व अन्य एक अशा तीन भाविकांचा पायी चालत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू  झाला. या घटनेने शोककळा पसरली असून माऊलींच्या पायी वारीत आलेल्या या मृत्यूमुळे भाविकांनी हळहळ व्यक्त केली आहे. फलटणचे प्रांताधिकारी संतोष जाधव, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. अभिजित पाटील, तहसीलदार विजय पाटील, व मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी या दिंडीतील लोकांची भेट घेऊन या घटनेबाबत दुःख व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published.