रोटरीचे 10 वे शस्त्रक्रिया शिबीर संपन्न.
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाइन.
पाटोदा — आनंद क्लॉथ सेंटर पाटोदा व आनंदऋषी नेत्रालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी क्लब पाटोदा यांच्या वतीने हे शिबीर दरमहा तिसऱ्या रविवारी आयोजित केले जात असून हे दहावे शिबीर असून आतापर्यंतच्या शिबिरात एकूण १५०० रुगणांची तपासणी करीत एकूण ३७४ रुगणावर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत.रविवार दि.१५ जुले रोजी झालेल्या नेत्र शिबिरात एकूण ५२ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून या पैकी १० रुग्ण नगर येथील आनंदऋषी नेत्रालाय येथे शस्त्रक्रिया साठी पाठविण्यात आले.आनंदऋषी नेत्रालाय चे डॉ.गाडेकर व डॉ.कवडे यांच्या टीमने रुग्णांची तपासणी केली महाराष्ट्र सरकारच्या मोतीबिंदू मुक्त योजनेस एक प्रकारे पाटोदा रोटरी क्लब पाटोदा यांनी हातभार लावला आहे .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष ,सचिव ,उपाध्यक्ष व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.