Home » ब्रेकिंग न्यूज » मेहनत केली पण वाया नाही गेली — शिंदे

मेहनत केली पण वाया नाही गेली — शिंदे

मेहनत केली पण वाया नाही गेली — शिंदे

डोंगराचा राजा / आँनलाईन.

— मेहनत केलेली कधीच वाया जात नाही, फळ मिळतेच.

— महात्मा फुले युवा दलाच्या कार्यक्रमात
नवनियुक्त उपजिल्हाधिकारी सुशांत यांचे प्रतिपादन.

बीड – मेहनत केलेली कधीच वाया जात नाही, फळ मिळतेच वेळ लागेल पण त्यातून चांगले फळ मिळाल्याशिवाय राहत नाही असे प्रतिपादन नवनियुक्त उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी केले.
जीवनामध्ये जर एक वेगळा इतिहास घडवायचा असेल तर आपले ध्येय उच्च ठेवा, मोठी स्वप्न पहा आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वस्वी प्रयत्न करा, मी अशाच एका कार्यक्रमाला गेलो होतो, तिथे मार्गदर्शन ऐकून मनात अधिकारी व्हायचं ठरवलं, महात्मा फुले युवा दलाने तुम्हाला खूप कमी वयामध्ये मार्गदर्शकांची संधी उपलब्ध करुन दिली आहे. प्रयत्न करा, यश तुमचेच असेल असे विचार नवनियुक्त आर.टी.ओ.मोरेश्वर साखरे यांनी मांडले.
महात्मा फुले युवा दलाचे प्रमुख व कार्यक्रमाचे अध्यक्ष अ‍ॅड.सतीष शिंदे म्हणाले की, समाज हितासाठी समाज संघटन यावाक्याप्रमाणे महात्मा फुले युवा दल काम करत आहे आणि राहणार. नवनियुक्त उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, आरटीओ मोरेश्वर साखरे, आदित्य अभंग यांनी सांगीतलेले विचार आत्मसात करुन व त्यांच्यासारखे अधिकारी होऊन समाजाची सेवा करावी असे ते कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी म्हणाले.
महात्मा फुले युवा दल बीड जिल्ह्याच्या वतीने माळी समाजातील गुणवंत विद्यार्थी, पालक व नियुक्त सरपंच, उपसरपंच, सदस्यांच्या सत्काराचे आयोजन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मण गुंजाळ, अ‍ॅड.राजेंद्र राऊत, शिवाजी साखरे, मयुर वैद्य, देव राजाळे, विशाल घाडगे, तुकाराम जाधव, अतुल काळे, सचिन दुधाळ, खेत्रे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजय शिंदे, पंकज साळुंके, बाळासाहेब रासवे, विशाल बनकर आदींनी परिश्रम घेतले. प्रस्ताविक महात्मा फुले युवा दलाचे बीड जिल्हाप्रमुख अजय शिंदे तर सूत्रसंचलन कैलास तुपे तर आभार प्रा.बाळासाहेब रासवे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.