Home » माझा बीड जिल्हा » पालखीचे पाटोदा नगरीत जोरदार स्वागत.

पालखीचे पाटोदा नगरीत जोरदार स्वागत.

पालखीचे पाटोदा नगरीत जोरदार स्वागत.

  हजारो भाविकानी घेतले मनोभावे दर्शन.

 अमोल जोशी /डोंगरचा राजा ऑनलाइन.

आषाढी एकादशीसाठी श्री. संत भगवान बाबा भगवानगड संस्थान येथून पंढरपुरला निघालेल्या पालखीचे पाटोदा नगरीत जोरदार स्वागत करण्यात आले.

पाटोदा शहरात श्री.संत भगवान बाबा यांच्या पालखीचे सकाळी ११ वाजता आगमन छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमान झाले.यावेळी पाटोदा गावकऱ्यांच्या वतीने प्रथम नागरीक सौ.अनिताताई गणेश नारायणकर, पोलिस पाटील सुहास जाधव,बाबासाहेब मुळे, बळीराम पोटे, यांनी भगवान महाराज यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यानंतर पालखी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नवीन बस स्टँड,राजमहमंद चौक,बाजार तळावरुन,भामेश्वर मंदीर येथे दाखल झाली.या पालखीचे भावीकभक्तांची जेवनाची व्यवस्था कन्या शाळा येथे  कल्याणराव भोसले यांच्या तर्फे पगंत ठेवण्यात आली होती.या भगवानबाबा पालखी दर्शनासाठी शहरासह खेड्यापाड़यातुन हजारो समाजबांधव उपस्तिथ होते .यानंतर भामेश्वर मंदिर येथे पालखीला सहकाऱ्या करणाऱ्या गावकऱ्यांचा भगवानगड संस्थांनच्या वतीने सत्कार करण्यात आले.यानतर पालखी टाळ  मुदंगाच्या व हरिनामाच्या जय घोषात विठ्ठल नामाचा गजर करीत दिघोळच्या दिशेने रवाना झाली.यावेळी.आप्पासाहेब राख,भिमराव जाधव मामा,संजय कांकरिया, जेष्ठ पत्रकार छगन मुळे,नगरसेवक विजय जोशी,अनिलसेठ बोरा, अॅड सुधीर घुमरेबळीराम पोटे, श्रीहरी गिते,संदीप जाधव,राजु जाधव, बालाजी जाधव, अॅड सुशिल कौठेकर,सुभाष अडागळे, ,पोपट कोल्हे, पठाण हमीद,सह.पाटोदा व परिसरातील बहुसंख्येने लोक उपस्थित होते

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.