Home » माझा बीड जिल्हा » ना.पंकजा मुंडेंच्या भाषणाचा परिणाम!

ना.पंकजा मुंडेंच्या भाषणाचा परिणाम!

ना.पंकजा मुंडेंच्या भाषणाचा परिणाम!
डोंगराचा राजा/आँनलाईन
— अन् ‘तो’ हुंडा प्रथेला झुगारून चढला बोहल्यावर
परळी दि. १५ —- राजकीय नेत्यांच्या सामाजिक सुधारणाच्या विचारांचा समाज मनावर कसा चांगला परिणाम होतो, याचा प्रत्यय देणारा एक प्रसंग आज अनुभवास आला. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या भाषणाचा परिणाम  एक तरूणांवर एवढा झाली की त्याने हुंड्यासारख्या अनिष्ट रूढी व परंपरेविरोधात जनजागृती तर केलीच शिवाय स्वतः देखील हुंडा न घेता बोहल्यावर चढून इतर युवकांसमोर आदर्श निर्माण केला, आज त्या तरूणाचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला.
    परळी तालुक्यातील मोहा येथील रवि हरिश्चंद्र चाटे असे हुंडा न घेता विवाह करणा-या त्या युवकाचे नांव आहे. आज त्याचा विवाह टोकवाडी येथील रत्नेश्वर मंदिरात बहादूरवाडी येथील पूजा उत्तमराव मुंडे हिच्यासोबत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी नव वधू वरांना त्यांच्या भावी वैवाहिक आयुष्यासाठी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.
    नेता आणि कार्यकर्ता तसं पहायला गेलो तर सामान्य शब्द! पण एखाद्या असामान्य नेत्यावर आपल्या अंतःकरणातून निःस्वार्थी प्रेम करत त्या नेतृत्वास जेव्हा कार्यकर्त्यांकडून ‘देवत्व’ बहाल केलं जातं,तेव्हा त्या नेतृत्वाची उंची आपणास कळून येते. आयुष्यभर लोकांच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य गाजवणारा आणि मृत्युनंतरही ‘जिवंत’ असणारा एकमेव लोकोत्तर नेता म्हणजे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब..!साहेबांनी आयुष्यभर समाजातील वंचित घटकांसाठी संघर्ष केला हे सर्वश्रुत आहेच, पण त्यांच्या जाण्यानंतर ना.पंकजाताई व खा.डॉ.प्रितमताईंनी हा समाजसेवेचा, उपेक्षितांच्या सेवेचा वसा व्रत म्हणून स्विकारला अन् या दोन्ही भगिनी वंचितांचाचा आवाज बनल्या. समाजात बदल अपेक्षित असेल तर अगोदर स्त्री बदलली पाहिजे..तिने ‘चूल आणि मूल’ या पलिकडे जावून आपल्या मनगटातल्या ताकदीकडे पाहिलं पाहिजे यासाठी त्या आजही प्रयत्न करताना दिसतायेत.
*अन् त्याने मनोमन ठरवले*
——————————
मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी नेहमीच प्रयत्न करणा-या ना.पंकजाताईंनी गोपीनाथगडावर झालेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना ‘समाज बदलाचा आपणही भाग व्हा..हे माझं बोलणं फक्त भाषण म्हणून ऐकू नका तर गोपीनाथगडावरून प्रेरणा घेऊन समाजपरिवर्तनाचं काम करा,त्याची सुरुवात आपल्यापासूनच करा.’ हुंड्यासारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना फाटा द्या असं आवाहन केलं होतं. तिथूनच रवी चाटे नावाच्या तरूणाचं मन आणि मत परिवर्तन झालं आणि आपल्या लोकनेत्याला आदरांजली आणि आपल्या नेत्याच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून हुंडा न घेता लग्न करण्याचा निर्णय घेतला. ज्या वाईट प्रथांमुळे समाज आज पतनाकडे चाललाय..नेमकी तिच गोष्ट हेरून व त्याची सुरवात आपल्यापासून करून रविने ‘हुंडाबंदी’ साठी घेतलेला पुढाकार अनेकांना अंतर्मुख करणारा तर आहेच पण राजकारणासारख्या क्षेत्रात  राजकीय नेत्यांप्रती असलेली आपली निष्ठा दाखविणारा आहे. निष्ठेचं अन् समर्पणाचं असं यथायोग्य उदाहरण यापेक्षा कोणतं असू शकतं?
••••

Leave a Reply

Your email address will not be published.