Home » माझा बीड जिल्हा » पालखी सोहळा उद्या पाटोद्यात.

पालखी सोहळा उद्या पाटोद्यात.

पालखी सोहळा उद्या पाटोद्यात.
अमोल जोशी डोंगरचा राजा ऑनलाइन.
– नाथ महाराज पालखी सोहळा उद्या पाटोदा मुक्कामी.
पाटोदा — आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पैठण येथून निघालेला श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळा उद्या बुधवार पाटोदा शहरात येत असुन हा पालखी सोहळा शहरातील शिवाजी चौक, बाजारतळ ,भामेश्वर मंदीर, रस्ता गल्ली मार्गे काळा हनुमान ठाना येथे मुक्काम ठिकाणी पोहचेल. तिथे सायंकाळी भजन, कीर्तन हे कार्यक्रम होतात. .येणाऱ्या सर्व वारकर्यांची जेवनाची व्यवस्था भामेश्वर मंदीर येथे अरुण जोशी व सचिन शिंदे यांनी केली आहे . श्री संत एकनाथ पालखीला पंढरपुरातही मोठा मान असुन, अगदी पुरातन काळापासून हा पालखी सोहळा पाटोदा येथून पंढ़रीकड़े मार्गस्थ होतो . गुरुवारी सकाळी हा पालखी सोहळा पारगाव येथे जातो, तिथे पालखीचे दूसरे रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो. त्यानंतर, पालखी दिघोळ मुक्कामी जाते .

चौकट- -पाटोदा- शिरूरकराना नाथ पावला. गेल्या शेकडो वर्षापासुन नाथ पालखी सोहळा शिरूर पाटोदा या तालुक्यातील अनेक गावातून जातो या पालखी मार्गासाठी केंद्र सरकारने करोड़ो रुपयांचा निधी रस्ता कामासाठी दिला असुन काम जोरात सुरु आहे या रस्ता कामा मुळे पाटोदा शिरूर या भागाची दैना फिटली असून रस्ते आता चकाचक होणार आहेत या दोन्ही तालुक्यात मिळून तब्बल60 ते 70 किमी मार्गावरुण हा पालखी सोहळा जातो .संत एकनाथ महाराज पावले अशीच या दोन्ही तालुक्यातील लोकांची भावना आहे कारण या पालखी मार्गामुळे या भागातील रस्ते अतिशय चांगले होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.