Home » राजकारण » महामार्गाचे शहरातील काम बंद.

महामार्गाचे शहरातील काम बंद.

महामार्गाचे शहरातील काम बंद.
रविकांत उघडे / डोंगराचा राजा आँनलाईन

— खामगाव-पंढरपूर दिंडी महामार्गाचे शहरातील काम बुधवार पर्यंत बंद

— सामाजिक कार्यकर्ते विनायक शिंदेच्या अर्जाची एमएसआरडीसी विभागाने घेतली दखल

माजलगाव — शहरातुन जाणाऱ्या खामगाव-पंढरपूर सी-548 या दिंडी महामार्गाचे काम शहरात सुरु होते.परंतु सदरच्या राष्ट्रीय महामार्गांचे काम अंदाजपत्रका प्रमाणे न करता सेटलमेंट करून शंभर फूट रस्ता सत्तर फूट जागेतच काम सुरू असल्याने माजलगाव शहराची वाढती व्याप्ती लक्षात घेता शंभर फूट किंवा त्यापेक्षा अधिक आवश्यक असलेले रुंदीकरण आता होणार की,नाही याकडे कोणत्याही सामाजिक राजकिय पुढार्‍यांनी लक्ष दिले नव्हते.पण येथील सामाजिक कार्यकर्ते विनायक शिंदे यांनी जालना येथील दिलिप बिल्डकॉन च्या कार्यालयात जाऊन हे काम थांबवण्यासाठीचे निवेदन दिले.त्यावर संबधित अभियंत्याने दि.११ बुधवार रोजी पर्यंत सदरचे काम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

माजलगाव शहराला जोडणारा खामगाव पंढरपूर सी-548 राष्ट्रीय महामार्ग शहरातून जात अाहे.अनेक दिवसा पासून शहरातील मुख्य रस्त्याच्या कामाची नागरिकांना प्रतीक्षा होती.शहरातील रस्त्याच्या कामाला सुरुवात केली असून संभाजी चौकापासून ते सिंदफणा नदी पर्यंतचे हे काम सुरू झाले आहे. शहराचा विकास होणार असल्याने जनतेची देखील तशी मानसिकता झाली होती.त्यानंतर दिलीप बिल्डकाँन कंपनीने शहरात १०० फूट रस्त्याचे मोजमाप करून त्या ठिकाणी पिवळे खांब रोवले होते. त्यामुळे त्या अंतरात रस्ता होणार असे सर्वाना ज्ञात असताना आता त्यामध्ये कोणत्या राजकिय नेत्याने दुर्बुद्धी सुचली अन हा रस्ताच अरुंद करुन त्यातही आपला टक्केवारी ठरवुन हे आपल्याच घशात टाकण्याचे कारस्थान रचले.त्यात “तो” पुढारी काही अंशि यशस्वी झाल्याचे तालुका व शहरातील चौकाचौकात याबाबत चर्चा रंगु लागली त्यामुळे आता हा रस्ता केवळ सत्तर फुटातच होत आहे.

आठ फूट दुभाजकाच्या दोन्ही बाजूंनी २५-२५ फूट सिमेंट रस्ता,त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अडीच-अडीच फुटाची नाली,त्यानंतर दोन्ही बाजूंनी ४-४ फुटांचे पेव्हर ब्लॉक,त्याखाली आठ इंच जाडीची पाइपलाइन व दोन्ही बाजूंनी ४-४ फुटाचा फूटपाथ होणार आहे.अशा पद्धतीने या रस्त्याचे काम होणार आहे.पण हे सर्व नागरिक बघ्यांची भुमिका घेत आहे.
शहरातील महत्वाचे असलेले डॉ.अांबेडकर चौक, छत्रपती शिवाजी चौक,यांचा घेरा वाढवण्याची आवश्यकता आहे.हे दोन्ही चौक अत्यंत वर्दळीचे असल्याने या परिसरातील अतिक्रमण हटवून काही इमारती पाडून रुंदीकरण होणे आवश्यक आहे.मात्र असे न होता आज मध्य भागापासून ३५ फुटावर जुनी नाली असताना आता केवळ २५ फुटावरच नवीन नाली होत आहे त्यामुळे शहराचा विकास व विस्तार करायचा की विकासात खोडा घालून रस्ता अरुंद करण्यात कोणाचा हात आहे हे उघड झाले पाहिजे. असाच प्रकार विजेचे खांब बसवताना होत आहे,कमी जास्त,व सोयीचे अंतर ठेवून कंपनीकडून खांब लावण्यात येत आहेत.यावरून कंपनी अंदाजपत्रका वरून काम न करता ऍडजेस्टमेंट करून काम करत असल्याने शहर विकासात खोडा निर्माण करत आहे. शासन कुठलेही काम करताना पुढील तीस वर्षाचा विचार करून प्लॅन तयार केला जातो.माजलगाव शहराची व्याप्ती पाहता असाच प्लॅन करण्यात आला होता.परंतु आता त्यात कोणत्या आधारावर बदल केला हे कळावयास मार्ग नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.