Home » माझा बीड जिल्हा » भिमशक्ती संघटना अध्यक्षपदी संजय जावळे.

भिमशक्ती संघटना अध्यक्षपदी संजय जावळे.

भिमशक्ती संघटना अध्यक्षपदी संजय जावळे.
अमोल जोशी / डोंगराचा राजा आँनलाईन
पाटोदा – पाटोदा येथे दिनांक ०८ /०७ /२०१८ रविवार रोजी भिमशक्ती सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष श्री.डी.एम.विद्यागर व बीड तालुका अध्यक्ष श्री.पोपट गायकवाड यांच्या उपस्थितीत व दे.मा.जावळे यांच्या अध्यक्षतेखाली भिमनगर येथे बैठकीचे आयोजन करून. पाटोदा तालुका अध्यक्षपदी श्री.संजय जावळे यांची निवड करण्यात आली आहे.प्रथमतःभगवान गौतम बुद्ध व भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पि. बी.जावळे व दे.मा.जावळे गुरुजी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन कार्यक्रमाची सुरुवात बुध्द वंदनेने करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री.डी.एम.विद्यागर यांनी भिमशक्ती या सामाजिक संघटनेचे व ध्येय धोरणाचे सखोल असे मार्गदर्शन केले. या वेळी खालील कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्ष श्री.संजय जी.जावळे,उपाध्यक्ष श्री.विलास जावळे,सचिव श्री.दिलीप तुकाराम जावळे, सहसचिव श्री.पवनकुमार भोकरे, कोषाध्यक्षपदी शेख महेशर ताहेर, सहकोषाध्यक्ष श्री.दिनेश लोंढे, सल्लागारपदी श्री.दे.मा.जावळे गुरुजी,श्री.पी.बी.जावळे, सदस्यपदी श्री.कर्णध्वज जाधव, रविंद्र जावळे, राजु दळगडे ,यांची निवड करण्यात आली.
यावेळी पोपट मोरे,सुधाकर जावळे,खंडू आडागळे, इत्यादी सह अनेक जण उपस्थित होते.यावेळी भिमशक्ती चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री.डी.एम.विद्यागर यांनी नुतन कार्यकारिणी चे स्वागत करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी दिलीप जावळे यांनी आलेल्या प्रमुख पाहुण्याचे स्वागत करुन आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.