शिक्षक नेते श्रीराम आघाव यांचे आपघाती निधन
डोंगरचा राजा / आँनलाईन
बीड – कास्ट्रईब संघटनेचे नेते श्रीराम आघाव यांचे आज 8 जुलै रोजी सकाळी 8.30 वाजता निधन झाले दुपारी 1 वाजता त्यांच्यात पार्थिवावर जन्म गावी वंजारवाडी येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे. शिक्षकनेते श्रीराम आघाव यांच्या मोटार सायकलला दि 7 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजता ट्रकने जबर धडक दिली होती.या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले मात्र डोक्यास गंभीर मार असल्याने ते यातून वाचू शकले नाहीत.त्यांच्या अपघाती निधनाने शिक्षण क्षेत्रात मोठी हानी झाली असून एक लढवय्या नेता गेल्याचे दुःख आहे. ते भाजपानेते सर्जेराव तात्या तांदळे,आणि वैजीनाथ नाना तांदळे,तसेच जगन्नाथ दादा तांदळे यांचे भाच्चे होते. ते कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य अध्यक्ष होते. त्यांच्या पार्थिवावर आज अंतविधी त्यांच्या जन्मगावी वंजारवाडी येथे दुपारी 1.00 वाजता होणार आहे.आघाव सर यांचा जनसंपर्क दांडगा होता,परिवार देखील मोठा असून त्यांच्या लहान भावाचे देखील काही वर्षांपूर्वी झालेले अकाली निधन आणि आता आघाव सर यांच्या अपघाती निधनाने आघाव कुटुंबियांवर मोठे दुःख कोसळले आहे या दुःखात डोंगरचा राजा परिवार सहभागी आहे..
