Home » माझा बीड जिल्हा » भाजपा महिला युवती आघाडी चा आदर्श उपक्रम.

भाजपा महिला युवती आघाडी चा आदर्श उपक्रम.

भाजपा महिला युवती आघाडी चा आदर्श उपक्रम.
सुर्यकांत बडे / डोंगरचा राजा आँनलाईन
– खरात आडगाव येथे केले वृक्षारोपण.

भाजपा महिला युवती आघाडी माजलगाव तालुकाध्यक्षा शितल सोंळके यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा आघाडी ने खरात आडगाव येथे वृक्षारोपण करून एक आदर्श उपक्रम राबविला.
पर्यावरण बिघडता समतोल यामुळे सर्वसामान्यांना जिवन जगने कठिण झाले आहे.त्यातच अवैध वृक्षतोडही मोठ्या प्रमाणात होत असुन ही समाजाला लागलेली किड आहे.अशीच परिस्थिती राहिली तर गाव व शहराला वाळवंटाचे स्वरूप प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही. यासाठी प्रत्येक माणसाने आपले कर्तव्य समजून समाजहित लक्षात घेऊन प्रत्येकी एक झाड लावणे काळाची गरज निर्माण झाली आहे.हीच गोष्ट लक्षात घेऊन माजलगाव तालुका महिला युवती आघाडी च्या आध्यक्षा शितल सोंळके यांच्या मार्गदर्शनाखाली खरात आडगाव येथे दि ५/७/२०१८रोजी शासनाच्या वृक्षलागवड संकल्पनाला साथ देत वृक्षारोपण करुन समाजाला एक आदर्श संदेश दिला.
यावेळी भाजपाचे जेष्ठनेते नितीन दादा नाईकनवरे, महिला युवती आघाडीच्या ता.आध्यक्षा शितल सोंळके, संतोष रासवे,रवि रासवे, कविता साळवे,निरजंना रणदिवे,भाग्यश्री आबुज,पुजा रासवे , प्रिया रासवे,पुजा शेजुळ,संगीता रासवे,निसार शेख,विजय रासवे,नारायण रासवे,अमन पब्लिक स्कुलच्या शिक्षक वृंद यांच्यासह गावातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.