Home » क्राईम स्टोरी » पिडितांना बालकल्याण समिती समोर आणावे – डाँ.वनवे.

पिडितांना बालकल्याण समिती समोर आणावे – डाँ.वनवे.

पिडितांना बालकल्याण समिती समोर आणा – डाँ.वनवे.
डोंगरचा राजा / आँनलाईन
— पोलिसांनी अल्पवयीन पिडितांना बालकल्याण समितीसमोर हजर करावे- डॉ. अभय वनवे.
— पोलिसांनी बालस्नेही असण्याची गरज.
— पोलिस अधिक्षक कार्यालयात बैठक.
— बाल न्याय अधिनियम कायद्यावर 2015 चर्चासत्र

बीड —
पोलिस ठाण्यात दाखल होणार्‍या अल्पवयीन प्रकरणांच्या केसमधील पिडितांना पोलिसांनी बालकल्याण समितीसमोर हजर करणे बाल न्याय अधिनियिम कायद्यानुसार बंधनकारक आहे. त्यामुळे पुढील कारवाई करण्याआगोदर सदरील प्रकरणातील अल्पयवीन पिडितांना बालकल्याण समितीसमोर हजर करावे असे आवाहन बाल कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. अभय वनवे यांनी केले. शनिवारी दि. 7 जुलै रोजी पोलिस अधिक्षक कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलिस अधिक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अजित बोर्‍हाडे, पोलिस उप अधिक्षक सुधिर खिरडकर, बाल कल्याण समितीचे तत्वशील कांबळे, कावेरी नागरगोजे, सिता बनसोडे, सुनिल बळवंते यांच्यासह जिह्यातील सर्व पोलिस उप अधिक्षक, पोलिस निरिक्षक यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना डॉ. अभय वनवे म्हणाले की, बाल न्याय अधिनियम (मुलांची काळजी व सरंक्षण) 2015 नुसार पोलिस ठाण्यात दाखल होणार्‍या अल्पवयीन प्रकरणातील पिडितांना बालकल्याण समितीसमोर हजर करणे बंधनकारक आहे. पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर पिडित मुलगा असो वा मुलगी त्यांना पालकांच्या ताब्यात देता येत नाही. असे असतांना देखील काही पोलिस गुन्हा नोंदवून त्या पिडित बालकांना पालकांच्या ताब्यात देतात. हे बाल न्याय अधिनियिम कायद्याचे उल्लघंन आहे. त्यामुळे पोलिसांना यापुढे प्रत्येक पोक्सो व इतर अल्पवयीन दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती बालकल्याण समितीला द्यावी, तसेच अशा अल्पवयिन प्रकरणात दाखल झालेल्या पिडितांना बाल कल्याण समितीसमोर हजर करावे असे डॉ. अभव वनवे म्हणाले. तसेच एखाद्या ठिकाणी बेवारस अवस्थेत सापडलेले बालक काही पोलिस स्टेशनकडून थेट न्यायालयात हजर करण्यात येते. त्यानंतर न्यायालय बाल कल्याण समितीच्या नावाने ऑर्डर काढते. जिल्ह्यात असा बरेच प्रकरणे घडल्याने आपण या चर्चासत्राचे आयोजन केले आहे. यापुढे आता सर्वांनी 0 ते 18 वयोगटातील काळजी व सरंक्षणाची गरज असणार्‍या बालकांना न्यायालयासमोर हजर न करता ते बाल कल्याण समितीसमोर हजर करावे असे आवाहनही डॉ. वनवे यांनी याप्रसंगी केले.
—–
आता पिडितांना तपासणीची वेगळी व्यवस्था
पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या प्रकरणातील पडितांची वैद्यकीय तपासणी करण्याची वेगळी व्यवस्था नव्हती. त्यामुळे पिडितांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जास्तीचा कलावधी जायचा. ही बाब लक्षात घेवून आता जिल्हा रूग्णालयात पिडितांची तपासणी करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस महिला कर्मचारी यांनी पिडितास जिल्हा रूग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी दालन क्र.4 मध्ये घेवून जावे. तेथून तात्काळ पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येईल. काही आडचण निर्माण झाल्यास माझ्याशी संपर्क करावा असे आवाहन बाल कल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. अभय वनवे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.