Home » माझी वडवणी » जगण्यासाठी वृक्ष लागवड करा – वाघमारे.

जगण्यासाठी वृक्ष लागवड करा – वाघमारे.

जगण्यासाठी वृक्षलागवड करा – वाघमारे.

सुर्यकांत बडे / डोंगरचा राजा आँनलाईन.

— मोहखेड वनविभागाच्यावतिने २१ हजार वृक्ष लागवडीच्या दिशेने वाटचाल.
— २१ हाजार वृक्ष लागवडीचे करणार उदिष्ट पुर्ण.

यंदाच्या पावसाळी मोसमात 13 कोटी वृक्ष लागवड करण्याचा महाराष्ट्र शासनाचा मानस असुन बीड जिल्ह्यात जिल्हा वनअधिकारी अमोल सातपुते यांच्या नियोजनाखाली 26 लाख वृक्ष लागवड कार्यक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.त्याच अंनुषगाने धारुर परिक्षेत्रातील मोहखेड बिटात 25 हेक्टर वनक्षेत्रात 21 हजार वृक्ष लागवड करण्याचा निर्धार करत येथिल वनविभागाने आज दि 7 रोजी सुरुवात केली असुन येथिल ग्रामस्थांचा सकारात्मक प्रतिसाद या उपक्रमाला होत असल्याचेे दिसत आहे.
याप्रसंगी बोलताना विज्ञान प्रगत झाले असले तरी प्रत्येक माणसास जगण्यासाठी आँक्सिजनची आवश्यकता असते ते पुरविण्याचे काम वृक्ष करतात म्हणून त्याचा मोठ्या प्रमाणात लागवडी बरोबरच जोपासना करण्यासाठी सर्वांनीच पुढे येण्याची आवश्यकता आहे.शासनस्तरावर वृक्ष लागवड करण्यासाठी प्रर्यंत्न केले जातात,पण त्यासाठी जनतेच्या सहकार्याची आवश्यकता असते,असे प्रतिपादन धारूर परिक्षेत्रातील मोहखेड बिटातील वनरक्षक दैवशाला वाघमारे यांनी केले.त्या मोहखेड येथील वनविभागाच्या आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात बोलत होत्या.तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन आलेले मराठी पत्रकार परिषदेचे राज्य मिडिया सेल प्रमुख संतोष स्वामी यांनी आपल्या खाष सैलितुन मार्गदर्शन करतांना वृक्ष हे अनेक पिढ्यांना आँक्सिजन देण्याबरोबर आपला परिसर,गाव तसेच शहराचे सौंदर्य वाढविण्यासाठी मदत करीत असतात म्हणून प्रत्येक नागरिकांनी एक तरी झाड लावण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे सांगीतले. तसेच पत्रकार सुर्यकांत बडे यांनी बोलतांना आपल्याला गेली अनेक वर्षापासून दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ आली असून दुष्काळाच्या दुष्टचक्रातुन बाहेर पडण्यासाठी वृक्ष लागवडी शिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. यावेळी मोहखेड येथिल सरपंच शिवराज सोळंके,रामकिसन व्हरकटे, पत्रकार संतोष स्वामी, सुर्यकांत बडे,नित्रुड येथील समाजिक कार्यकर्ते अर्जुन तातोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत वड,करंज, पिंपळ,बांबु,चिंच,आवळा,सिताफळ यासह विविध प्रकारच्या झाडांचे रोपन आज करण्यात आले.या वेळी वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी अशोक लांडगे,वनरक्षक दैवशाला वाघमारे, वनमजुर मदने यांनी वृक्षरोपनात विशेष खबरदारी घेत काम केले.मोहखेड, व्हरकटवाडी, सुरनरवाडी च्या ग्रामस्थांनी परिश्रम घेत वृक्ष लागवड कामी वनविभागाला मदत केली.यावेळी
परमेश्वर गायकवाड, दत्ता सोळंके, प्रकाश सोनटक्के, प्रभाकर राठोड ,किसन राठोड यांचासह महिला वर्गांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवून वृक्षरोपन कार्यक्रमात विशेष सहकार्य केल्याने वनरक्षक दैवशाला वाघमारे यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.