Home » माझी वडवणी » मोहखेड नियतक्षेत्रात 21 हजार वृक्ष लागवड.

मोहखेड नियतक्षेत्रात 21 हजार वृक्ष लागवड.

मोहखेड नियतक्षेत्रात 21 हजार वृक्ष लागवड.
डोंगरचा राजा / आँनलाईन 
यंदाच्या पावसाळी मोसमात 13 कोटी वृक्ष लागवड करण्याचा महाराष्ट्र शासनाचा मानस असुन बीड जिल्ह्यात जिल्हा वनअधिकारी अमोल सातपुते यांच्या नियोजनाखाली 26 लाख वृक्ष लागवड कार्यक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. धारुर परिक्षेत्रातील  मोहखेड बिटात  25 हेक्टर वनक्षेत्रात 21 हजार वृक्ष लागवड करण्याचा येथिल वनविभागाने आज दि 7 रोजी सुरुवात केली असुन येथिल ग्रामस्थांचा सकारात्मक प्रतिसाद या उपक्रमाला होत असल्याचेे दिसत आहे.
मोहखेड येथिल डोंगर रांगेत येथिल सरपंच शिवराज सोळंके,रामकिसन व्हरकटे, पत्रकार संतोष स्वामी, सुर्यकांत बडे यांच्या प्रमुख उपस्थितीत वड,करंज, पिंपळ,बांबु,चिंच,आवळा,सिताफळ सह दहा विविध प्रकारच्या झाडांचे रोपन आज करण्यात आले.या वेळी वनविभागाचे वनपरिमंडळ  अधिकारी अशोक लांडगे,वनरक्षक दैवशाला वाघमारे, वनमजुर मदने यांनी वृक्षरोपनात विशेष खबरदारी घेत काम केले.
मोहखेड, व्हरकटवाडी, सुरनरवाडी च्या ग्रामस्थांनी परिश्रम घेत वृक्ष लागवड कामी वनविभागाला मदत केली.अर्जुन तातोडे ,परमेश्वर गायकवाड, दत्ता सोळंके, प्रकाश सोनटक्के, प्रभाकर राठोड ,किसन राठोड आदिंनी वृक्षरोपन कार्यक्रमात विशेष सहकार्य केल्याने वनरक्षक दैवशाला वाघमारे यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.