Home » क्राईम स्टोरी » बीड जिल्ह्यातील तीन गावांत तणाव.

बीड जिल्ह्यातील तीन गावांत तणाव.

जिल्ह्यातील तीन गावांत तणाव.
डोंगरचा राजा /आँनलाईन 
—  हाणामारीत १५ जखमी.
गेवराई तालुक्यातील मारताळा, टाकळी आणि लोनाळ तांडा या तीन गावांच्या मध्य रस्त्यावरील चौकात झेंडा कोणत्या समाजाचा लावायचा यावरुन दोन गटात शनिवारी वाद झाला.
शुक्रवारी रात्री चौकात अज्ञातांनी चौकात त्यांच्या समाजाचा झेंडा लावल्याने हा वाद निर्माण झाला.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात चौकात झेंडा लावण्यावरुन दोन गटात वाद झाल्याची घटना घडली असून हाणामारीत १५ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून जखमींची प्रकृती सध्या स्थिर आहे.
गेवराई तालुक्यातील मारताळा, टाकळी आणि लोनाळ तांडा या तीन गावांच्या मध्य रस्त्यावरील चौकात झेंडा कोणत्या समाजाचा लावायचा यावरुन दोन गटात शनिवारी वाद झाला. शुक्रवारी रात्री चौकात अज्ञातांनी चौकात त्यांच्या समाजाचा झेंडा लावल्याने हा वाद निर्माण झाला.
याची माहिती मिळताच तिन्ही गावातील लोक घटनास्थळी जमले. काही वेळाने हा वाद चिघळला आणि तिन्ही गावातील ग्रामस्थांमध्ये हाणामारी सुरु झाली. काठ्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आला. तसेच दगडफेकही करण्यात आली. याची माहिती मिळताच तळेवाडा पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केल्याने परिस्थिती आणखी चिघळली. पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला पांगवले. सध्या परिसरात शांतता असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.