Home » माझी वडवणी » पाटोदा येथे नेत्रशिबिराला मोठा प्रतिसाद.

पाटोदा येथे नेत्रशिबिराला मोठा प्रतिसाद.

पाटोदा येथे नेत्रशिबिराला मोठा प्रतिसाद.

अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाइन.
महाराष्ट् राज्याच्या मंत्री बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित पाटोदा तालुक्यातील सर्व पंचायत गणात आमदार सुरेश धस यांनी नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन आनंदऋषी हॉस्पिटल नगर यांच्या सयुक्त विद्यमाने केले होते .या नेत्र शिबिरास तालुक्यात सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळाला असुन आज पाटोदा शहर, सौताडा, अंमळनेर ,डोंगरकिणी, पिठ्ठी, दासखेड ,पारगाव, या गणातील कुसळब, अमळनेर, डोंगरकिन्ही, काकड़हिरा ,वैद्यकिनी या ठिकाणी आज हे नेत्रशिबिर पार पडले. तसेच पाटोदा येथे नगरपंचायत कार्यालय येथे आज नेत्रशिबिरसाठी सकाळपासुन मोठी गर्दी होती .पाटोदा येथे जवळपास 700 रुग्नाची नेत्रतपासणी करण्यात आली, तर 100 जणांची मोतीबिंदु शस्रक्रिया करण्यात येणार आहे .येथे आलेल्या रुग्नासाठी चहापानी तसेच नाश्ताची व्यवस्था करण्यात आली होती. पाटोदा येथे रोटरी क्लबही गेल्या वर्षभरपासून दरमहा या शिबिराचे आयोजन करते, त्यानंतर आता आमदार सुरेश धस यांनी आयोजित केलेल्या या आरोग्य शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला असुन अण्णाच्या या उपक्रमाचे जनतेने स्वागत केले आहे. हे नेत्रशिबीर यशस्वी करण्यासाठी सुरेश धस मित्रमंडळ, भाजप कार्यकर्ते सर्व नगरसेवक, पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published.