Home » राजकारण » डोंगरकिन्ही येथे 550 रुग्णांची तपासणी.

डोंगरकिन्ही येथे 550 रुग्णांची तपासणी.

डोंगरकिन्ही येथे 550 रुग्णांची तपासणी.
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाइन
–137 रुग्णांवर होणार मोतीबिंदु शस्त्रक्रिया.
— आ.सुरेश धस यांची शिबिराला भेट.
बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने आज डोंगरकिन्ही येथे आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेत्रचिकत्सा व मोतिबिंदु निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .या नेत्रशिबिरात डोंगरकिन्ही गणातील तब्बल 550 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली यामधील 137 रुग्णांवर मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. आनंदऋषी हॉस्पिटल नगरचे डॉ गाड़ेकर संपूर्ण टीमसह सकाळी 8 पासुन ते दुपारी 3 वाजेपर्यन्त अविरत तपासणी सुरूच होती ,या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला असुन डोंगरकिन्ही, उंबरविहीरा, नाळवंडी, कारेगाव ,मांडवेवाडी, जेधेवाडी ,भाटेवाडी, चुंबळी, मोरजवाडी, या गावातील रुग्ण आलेले होते .दुपारी आमदार सुरेश धस यांनी या शिबिरला भेट दिली, यावेळी तब्बल तासभर ते या ठिकाणी उपस्तिथ होते. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब येवले ,अनिल काथवटे ,सरपंच बापुराव रायते, यांच्यासह सर्व सदस्य, गांवकरी ,सुरेश धस मित्रमंडळ ,भाजपा कार्यकर्ते ,यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.