अंपग बांधवानी नोंद करावी.
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाइन
पाटोदा-– पाटोदा नगर पंचायत अंतरर्गत येणाऱ्या सर्व अंपग, अंध, मुकबधीर महिला, पुरुष यांनी आपल्या अंपगत्वाची नोंद पाटोदा नगर पंचायतला करावी जेणे करुन , स्थानिक स्वराज्य संस्थानी त्यांच्या स्वउत्पन्नातुन तीन टक्के निधी दिव्यांग कल्यान योजनेसाठी खर्च करणे अपेक्षीत आहे.त्या अनुषगाने निधीचे वाटप करण्याची मागणी अंपग संघर्ष समिती बीड च्या माध्यमातुन करण्यात आलेली आहे तरी पाटोदा नगरपंचायत हद्दीतील सर्व अंपगानी ४० टक्के पासुन पुढचे ऑनलाईन अंपग प्रमाणपत्र आसणाऱ्यानी तात्काळ अंपगाची नोंद पाटोदा नगरपंचायत मध्ये करावी,आसे आवाहन अंपग संघर्ष समिती चे जिल्हा अध्यक्ष शेख जीलानी व कु.सुरेखा खेडकर यांनी केले आहे.
तसेच जिल्हा परिषद,पंचायत समिती नगर पंचायत व ग्रामपंचायत यांच्या स्व उत्पन्नातुन ३ टक्के निधी अंपगाच्या कल्याणासाठी राखुन ठेवण्याचे आदेश होते आता महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाने हा निधी वाढवुन ५ टक्के केला आहे,
पाटोदा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीना अंपगाचा तीन टक्के निधी वर्ग केलेला आहे तो अंपगा पर्यंत पोहचला का नाही या साठी तालुक्यातील सर्व अंपग बांधवाना याची माहीती मिळण्यासाठी दि.१५/०७/२०१८ रोजी पाटोदा येथे अंपगाची बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे तरी पाटोदा तालुक्यातील सर्व अंपग , बंधु भगीनी यांनी हजर राहावे असे आवाहन अंपग संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष शेख जिलानी, सुरेखा खेडकर, अशोक दगडखैर, संतोष राख ,दत्ता कदम,नानासाहेब डिडूळ,आबा नारायणकर,
गणेश नांदे,बावणे महाराज,संतोष गाडेकर
,हानुमंत काळुसे,सय्यद मतीन,नंदा घुमरे,
आमटे,लीबांजी काळे, पोपट पोकळे, आरीफ मिस्त्री ,संदीपान नागरगोजे,वैभव देशमुख,शेख नदीम,शेख मोहीद, यांनी केले आहे.