संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी.
डोंगरचा राजा / आँनलाईन.
— संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी चार दिवस बीड जिल्हा मुक्कामी.
परळी वैजनाथ दि.०६ — शेगाव वरून १९ जून रोजी निघालेली श्री संत गजानन महाराजांची पालखी बीड जिल्ह्यात चार दिवस मुक्कामी असणार आहे.पालखीचे स्वागत करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे भक्त-भाविक सज्ज झालेले असून महाराजांच्या दर्शनासाठी आतुरही झालेले आहेत.परळी(थर्मल कॉलनी),परळीवैजनाथ,अंबाजोगाई,बोरी सावरगाव या गावी मुक्कामी असणार आहे.
दि.०६ रोजी परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव येथे दुपारी आगमन होत असून संध्याकाळी परळी येथील शक्तीकुंज वसाहत येथे पालकीचा मुक्काम असेल,दि.०७ रोजी परळी येथील जगमित्र नागा मंदिरात,दि.०८ रोजी कन्हेरवाडी मार्गे अंबाजोगाई येथे मुक्कामी असणार आहे,दि.०९ रोजी सकाळी लोखंडी सावरगाव मार्गे जाऊन केज तालुक्यातील बोरीसावरगाव येथे पालखीचा मुक्काम असणार आहे.