शिंदे कुंटुबावरील खोटे गुन्हे मागे घ्या – डाँ. ओव्हाळ
डोंगरचा राजा / आँनलाईन.
डाँ.आंबेडकर विकास मंचचा निषेध मोर्चा.
वडवणी — पिडित शिंदे कुंटुबावरच खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ डाँ.बाबासाहेब आंबेडकर विकास मंचच्या कार्यकर्त्यांनी वडवणी पोलिस स्टेशनवर डोक्यांना काळ्या पट्ट्या बांधून नुकताच निषेध मोर्चा काढला.
वडवणी तालुक्यातील केंडेपिंप्री येथे कांही दिवासांपुर्वी चंद्रसेन शिंदे सह महिलांना काठ्या कु-हाडीने अमानुष मारहाण करण्यात आली.
जिल्हा रुग्णालयात ते भयभीत अवस्थेत उपचार घेत आहेत.तसेच शिंदे कुंटुबाचा बोअर ,मोटार गायब आहे.अशी परिस्थिती असताना वडवणी पोलीसांनी शिंदे कुंटुबावरच खोटे गुन्हे दाखल केले.याचा जाहिर निषेध डाँ.बाबासाहेब आंबेडकर विकास मंच करीत असुन येत्या ४८ तासात शिंदे कुटुंबावरील गुन्हे मागे घेऊन त्यांना न्याय द्यावा.नसता या नंतर वडवणीत तिवृ रस्तारोको आंदोलन छेडण्याचा ईशारा डाँ.जितेंद्र ओव्हाळ यांनी दिला.असुन सदर मागण्याचे निवेदन येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक खाडे यांना देण्यात आले आहे.यावेळी गौतम वीर,आकाश सोनवने,मसु कांबळे ,महादेव बडे,राजेश शिंदे ,संजय शिंदे सह आदी उपस्थित होते.
