Home » ब्रेकिंग न्यूज » बांधकाम विभागावर जप्तीची नामुष्की.

बांधकाम विभागावर जप्तीची नामुष्की.

बांधकाम विभागावर जप्तीची नामुष्की.
डोंगरचा राजा / आँनलाईन
— बांधकाम विभागावर जप्तीची नामुष्की
मोरया इन्फ्रटस्ट्रक्‍चरला सहा कोटी रुपये देण्याचे आदेश.

बीड — जिल्ह्यातील चुंबळीफाटा-पाटोदा-मांजरसुंबा हा रस्ता बीओटी तत्वावर मोरया इन्फ्रट स्ट्रक्‍चरने बांधला होता. परंतु शासनाच्या टोल बंदी धोरणामुळे हा टोलनाका मुदतीच्या आतच बंद करावा लागला. यामुळे कंत्राटदाराचे मोेठे नुकसान झाले होते. सदरचे आर्थिक नुकसान बांधकाम विभागाने द्यावे अशी मागणी मोरया इन्फ्र ास्ट्रक्‍चरने लवादाकडे केली होती. यात लवादाने सहा कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश बांधकाम विभागाला दिला असून ही रक्कम न दिल्यास फ र्निचर, संगणक व एसी इत्यादी वस्तु जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
मोरया इन्फ्र ास्ट्रक्‍चरने बांधलेला हा रस्ता त्यांची गुंतवणूक रक्कम वसुल होण्याच्या आतच टोल बंद करावा लागला होता. यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले होते. शासन आणि कंत्राटदार यांच्यामध्ये तोडगा काढण्यासाठी लवाद नेमण्याचे यापुर्वीच ठरले होते त्यानुसार दि.19 फे ब्रुवारी 2017 ला लवादाची स्थापना करण्यात येवून लवादापुढे अनेक दिवस सुनावणी सुरु होती. दोन्ही बाजु ऐकून घेवून लवादाने नुकसान भरपाई म्हणून 5 कोटी 97 लाख 62 हजार 888 रुपये द्यावेत असा निकाल दिला आहे. पण सदर आदेशाला कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग बीड यांनी केराची टोपली दाखवल्याने मोरया इन्फ्र ास्ट्रक्‍चरने जिल्हा न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयात सुनावणी होवून लवादाचा निर्णय कायम ठेवत सार्वजनिक बांधकाम खात्याने कंत्राटदारास पैसे न दिल्यामुळे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग बीड यांच्या कार्यालयातीन फ र्निचर, संगणक, ए.सी इत्यादी वस्तु जप्त करण्याचे आदेश दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.