Home » माझी वडवणी » महिलेची जमावाच्या तावडीतून सुटका.

महिलेची जमावाच्या तावडीतून सुटका.

महिलेची जमावाच्या तावडीतून सुटका.
डोंगरचा राजा / आँनलाईन
धुळ्याची पुनरावृत्ती टळली, सतर्क पोलिसांमुळे महिलेची जमावाच्या तावडीतून सुटका

नागपूर — जिल्ह्यातील करभांड येथे सतर्क पोलिसांमुळे धुळ्यातील घटनेची पुनरावृत्ती टळली. मुले पळवणाऱ्या टोळीतील सदस्य असल्याच्या संशयातून एक महिला जमावाच्या तावडीत सापडली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत महिलेची सुटका केली आणि पुढील अनर्थ टळला.

‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, नागपूरमध्ये राहणऱ्या जयश्री रामटेके या गावागावात वनौषधी विकतात. बुधवारी दुपारी त्या करभांड गावात गेल्या असता त्यांच्या पोशाखाकडे बघून स्थानिकांना संशय आला. मुले पळणाऱ्या टोळीतील सदस्य असल्याच्या संशयातून स्थानिकांनी जयश्री यांची चौकशी केली. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. मुले पळवणाऱ्या टोळीतील एका महिलेला पकडल्याची अफवा पसरली. काही क्षणातच गर्दी वाढली. जमावातील काही मंडळींनी महिलेला मारहाणीचा प्रयत्न देखील केला. एका जागरुक नागरिकाने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जयश्री यांची सुटका केली. जयश्री सुखरुप असल्याचे पोलिसांनी सांगितले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.