स्व.वसंतराव नाईकांची जयंती साजरी.
डोंगरचा राजा / आँनलाईन
वडवणी, (प्रतिनिधी) हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईकांची जयंती वडवणी शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील वसंतराव नाईक चौकात सकाळी 9 वाजता अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पांढऱ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. फटाक्याच्या प्रचंड अतिषबाजी करण्यात आली. स्व. वसंतराव नाईकांच्या जयघोषाने परिसर ढवळून निघाला होता. तालुक्यातील बंजारा समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. तालुक्यातील प्रत्येक तांड्यावर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वसंतराव नाईक यांनी केलेले कार्याची माहिती सांगताना वसंतराव नाईक हे आधुनिक महाराष्ट्राचे खरे शिल्पकार आहेत त्यांनी महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठ स्थापन करून शेतीवरील संशोधनाला चालना दिली. 1972 च्या दुष्काळात महाराष्ट्रातील जनता भुकेने व्याकुळ होती त्यावर उपाय म्हणुन हब्रीड वाण आणले व जाणतेच्या हाताला काम मिळावे म्हणून जगात पहिल्यादाज रोजगार हमी योजना सुरु केली. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था निर्माण केली. महाराष्ट्रत सिंचन क्षेत्र वाढवले. अनेक प्रकल्प सुरु केले. यावेळी विविध दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रम करण्याचे ठरवण्यात आले. तर दि. 02/07/2018 रोजी 5.00 वाजता वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमासाठी संयोजन समितीची बैठक बचत भवन वडवणी येथे करण्यात येणार आहे .