Home » ब्रेकिंग न्यूज » डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर
डोंगराचा राजा/आँनलाईन
— नागपूर मध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण.
मुंबई : — सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दिले जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार तसेच संत रविदास पुरस्कार जाहीर झाले असून एकूण ७५ पुरस्कारांचे वितरण उद्या मंगळवारी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, दिक्षाभूमी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  होणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे  दिली.
अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय जाती, शारिरीक व मानसिकदृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी अशा वंचित घटकांसाठी मौलिक कार्य करणाऱ्या ६२ सामाजिक कार्यकर्त्यांना तसेच ६ संस्थांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी निवड झालेल्या कार्यकर्त्यांना  १५ हजार रूपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह तसेच शाल-श्रीफळ तर संस्थांना प्रत्येकी २५ हजार रूपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह आणि शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येईल.  तसेच पद्मश्री कर्मवीर दादासाहेब भाऊराव गायकवाड पुरस्कारासाठी एक व्यक्ती व एका संस्थेची तसेच संत रविदास पुरस्कारासाठी  ४ व्यक्ती व एका संस्थेची निवड झाली असून प्रत्येक व्यक्तीला २१ हजार रूपयांचा तर संस्थेला ३० हजार रूपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ देऊन गौरविण्यात येणार असल्याचे बडोले यांनी नमूद केले आहे.
२०१७-१८ यावर्षाकरीता नागपूरातील 18 सामाजिक कार्यकर्त्यांना, मुंबई शहर तसेच मुंबई उपनगरातून ७, पुणे जिल्ह्यातील ६, ठाणे जिल्ह्यातील ४, लातूरमधिल ३, अमरावती,  हिंगोलीतील २ तर सिंधूदूर्ग, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, नाशिक, जळगाव, अहमदनगर, नांदेड, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ, वर्धा, भंडारा, औरंगाबाद, परभणी तसेच बीड जिल्ह्यातील प्रत्येकी एका सामाजिक कार्यकर्त्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून पुणे, ठाणे, गडचिरोली, सोलापूर, कोल्हापूर, आणि धुळे येथील प्रत्येकी एका संस्थेची निवड करण्यात आली आहे.
नागपूर मधून  वसंत भगत, विजय भोयर,  प्रकाश कुंभे, हंसराज मेश्राम,  भाऊराव लोखंडे, शरद अवथरे,  भैय्यासाहेब बिघणे, कृष्णराव चव्हाण,  भूपेश थुलकर,  भाऊराव गुजर, विलास गजघाटे, श्रीमती करूणाताई चिमणकर, रमेशकुमार मेहरूलिया, श्रीमती उमाताई पिंपळकर, ह.भ.प. रामकृष्णाजी सुकान्युजी पौनीकर महाराज, भिमराव इंगळे, सौ. परिणीता मातुरकर, दिलीप गोईकर अशा १८ कार्यकर्त्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी निवड झाली आहे. मुंबई शहर मधिल ॲड. डॉ. प्रल्हाद खंदारे, चंद्रभान थुल, अरूण भालेकर, प्रकाश जाधव, दयानंद काटे यांची तर मुंबई उपनगरातील श्री. चंद्रकांत बानाटे, श्रीमती सुचित्रा इंगळे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील बच्चुसिंग टाक, श्रीकांत मंत्री, प्रभाकर फुलसुंदर, सिध्देश्वर जाधव,डॉ. जनार्दन मुनेश्वर, बापुसाहेब सरोदे यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली तर ठाणे जिल्ह्यातून  साकीब गोरे,  भरत खरे, सौ. विद्या धारप, डॉ. रेखा बहनवाल यांची तसेच लातूर जिल्ह्यातून पंडीत सुर्यवंशी, केशव कांबळे आणि  मोमीन गफूरसाब यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हिंगोली जिल्ह्यात सुरजीतसिंह वाघमारे (ठाकूर), साहेबराव कांबळे यांची तर गोंदिया जिल्ह्यातून श्रीमती सविता बेदरकर, रतन वासनिक यांची तसेच अमरावती जिल्ह्यातून  सुधाकर पोकळे, रामेश्वर अभ्यंकर यांची निवड झाली आहे.
सिंधुदूर्गचे चंद्रकांत जाधव, रत्नागिरीचे  काशिराम कदम, साताराचे  विश्वनाथ शिंदे, सोलापूरचे भिमराव बंडगर, कोल्हापूरचे  सदाशिव आंबी, सांगलीचे  राजाराम गरूड, नाशिकचे  राजेश सोदे, जळगावचे  शिवाजी पाटील, अहमदनगरचे  दिपक गायकवाड, नांदेडचे  यादव तामगाडगे, अकोला जिल्ह्यातील श्रीमती सुचिता बनसोड, यवतमाळचे  हेमंतकुमार भालेराव, वर्धा जिल्ह्यातून राजेश अहिव, भंडारातील  प्रा. विनोद मेश्राम, औरंगाबादचे डॉ. ऋषिकेश कांबळे, परभणी येथील  भिमराव हत्तीअंबीरे तर बीड येथून  शंकर विटकर यांची तसेच जनसेवा फाऊंडेशन पुणे, आरोग्य प्रबोधनी, गडचिरोली, इंदिराबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्ट ठाणे, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाण सोलापूर, कोल्हापूरी लेदर चप्पल उत्पादक व विक्रेता संस्था कोल्हापूर आणि परिवर्तन विद्याप्रसारक संस्था धुळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी अस्पृष्यतेविरूध्द उभारलेली सामाजिक चळवळ, भूमीहीन शेतमजूर व कामगारांसाठी केलेल्या कामांतून स्फूर्ती घेऊन वाटचाल  करणाऱ्या बिडच्या जागर प्रतिष्ठाण या संस्थेची तर  तुमसर येथील श्रीमती मिरा संतोष भट यांची पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
चर्मकार व दलित समाजघटकाच्या उध्दारासाठी कार्य करणाऱ्या  मुंबई उपनगरातील श्री. पंढरीनाथ पवार, डॉ. रोहीदास वाघमारे, पुणे येथील डॉ. आनंद गवळी तसेच बुडढाणा येथील दगडू रामा माळी यांची तसेच अमरावती येथील रविदास विश्वभारती प्रतिष्ठाण संस्थेची संत रविदास पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.