Home » माझी वडवणी » मराठीत याद्या करा नसता तीव्र आंदोलन – बादाडे

मराठीत याद्या करा नसता तीव्र आंदोलन – बादाडे

मराठीत याद्या करा नसता तीव्र आंदोलन – बादाडे
डोंगराचा राजा/आँनलाईन
वडवणी — शासनाने सन 2017-18 सालच्या पिक विमा योजने अंतर्गत वडवणी तालुक्यात सर्व गावांना पिक विमा मंजुर केलेला आहे तरी पिक विमा धारक शेतकऱ्यांच्या नावाच्या याद्या या बँकेने इंग्रजीत लावलेल्या आहेत त्यामुळे शेतकरी गोंधळात पडला आहे तरी पिक विमा व कर्ज माफीच्या शेतकऱ्यांच्या नावाच्या याद्या बँकेने मराठीत लावाव्यात नसता राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व मनसे बीड जिल्हा अध्यक्ष श्रीराम बादाडे यांच्या नेतृत्वाखाली मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तहसिलदार यांना दिलेल्या लेखी निवेदनाव्दारे मनसे वडवणी तालुका अध्यक्ष गणपत खोटे यांनी दिला आहे .
शासनाने या अगोदर शेतकऱ्यांना कर्जे माफी केलेल्या नावाच्या याद्या या इंग्रजीत प्रसिध्द केल्याने असंख्य शेतकऱ्यांना वाचण्यास अडचण आलेली असून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती आता परत शासनाने प्रधानमंञी पिक विमा योजने अंतर्गत तालुक्यातील सर्व गावांना पिक विमा मंजुर केलेला आहे .तरी या पिक विम्याच्या शेतकऱ्यांच्या नावाच्या याद्या या जिल्हा मध्यवर्ती बँक वडवणी शाखेत भिंतीवर इंग्रजीत प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत .तरी पिक विमा व कर्ज माफीच्या याद्या बँकानी मराठीत प्रसिध्द कराव्यात नसता राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व बीड जिल्हा अध्यक्ष श्रीराम बादाडे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तहसिलदार यांना दिलेल्या लेखी निवेदनाव्दारे मनसे वडवणी ता.अध्यक्ष गणपत खोटे यांनी दिला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.