Home » माझी वडवणी » प्रशासनाने केली कुंडलिका धरणाची पाहणी.

प्रशासनाने केली कुंडलिका धरणाची पाहणी.

प्रशासनाने केली कुंडलिका धरणाची पाहणी.
हनुमान बडे | डोंगराचा राजा

दुष्काळामध्ये तीन तालुक्यांना पाणी पुरवठा करणारे कुंडलिका धारण आज मृत माशामुळे दुषित झाले आहे.याची पाहणी करण्यासाठी वडवणी तहसीलचे तहसीलदार मा.सुनील पवार यांनी व प्राथमिक आरोग्य केंद्र कुप्पाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.उषा बांगर यांनी पाहणी केली .यावेळी पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतली आहेत.या धरणामधील मासे मृत कशामुळे झाले व कधी झाले याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकारी यांना देता आली नाही.त्यामुळे यावरून धरणाच्या सुरक्षेसाठी कोणताही कर्मचारी दिसून येत नाही.असे तहसीलदार यांच्या निदर्शनास आले.ईतकी मोठी घटना होऊन सुद्धा पाटबंधारे विभागाच्या अधिकारी यांनी धरणास भेट दिली नाही.या साठी तहसीलदार यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी दत्तात्रय गुलभिले यांना फोनवर जाब विचारला.याबरोबरच मासे मार संस्थेला सुद्धा तहसीलदार यांनी तत्काळ मासेमारी बंद करण्याचे आदेश दिले आहेत.पुढील कार्यवाही होईपर्यंत मासे मारी करायची नाही असे तहसीलदार पवार यांनी सांगितले आहे.यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र कुप्पाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.उषा बांगर यांनी संगीतले की या धरणामधून पकडलेले मासे कोणीही खाऊ नये यामुळे विषबाधा होऊ शकते.त्याच बरोबर परिसरातील नागरिकांनी पाणी तपासणी अहवाल येईपर्यंत पाणी पिण्यास वापरू नये.सदरील धरणामध्ये मासे कशाने मरण पावले याची योग्य चौकशी करून परिसरातील नागरिकांची भीती दूर करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी तहसीलदार यांच्या कडे केली यावेळी तहसीलदार सुनील पवार,प्राथमिक आरोग्य केंद्र कुप्पाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.उषा बांगर,सिस्टर सोनवणे,तलाठी संगीता राऊत,तलाठी भूषण पाटील,विजय चव्हाण, पशुधन अधिकारी डॉ.शुक्ला,मासेमार संस्थेचे तुकाराम भांडारे,पञकार हनुमान बडे,शेख युनूस,राजेंद्र राऊत,रुस्तुम सावंत,दिलीप बडे, अशोक बडे यांच्या सह परिसरातील नागरिक

चौकट

१ कुंडलिका धरणामधील पाण्याचा अहवाल येईपर्यंत धरणामधील मासेमारी पूर्ण बंद करण्यात आली आहे.याच बरोबर पाटबंधारे विभागाचे दोषी अधिकारी कर्मचारी आहेत यांच्यावर नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.——–

मा. सुनील पवार तहसीलदार वडवणी.

२ या परिसरातील नागरिकांनी तलावातील पाणी पाणी तपासणी अहवाल येईपर्यंत पाणी पिण्यास वापरू नये.याची दक्षता नागरिकांनी घ्यावी.———

डॉ.उषा बांगर वैद्यकीय अधीक्षक प्राथमिक आरोग्य केंद्र कुप्पा.

Leave a Reply

Your email address will not be published.