Home » राजकारण » केवळ निधी आडवण्याचे काम केले- धनंजय मुंडे.

केवळ निधी आडवण्याचे काम केले- धनंजय मुंडे.

केवळ निधी आडवण्याचे काम केले- धनंजय मुंडे.
डोंगरचा राजा / आँनलाईन

— विकास दौर्‍यामुळे परळी तालुक्यात चैतन्याचे वातावरण.

परळी दि. 01 राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी मी सरकारशी दोन हात करीत आहे. परळीतील जनतेसाठी आणि त्यांच्या विकासासाठी तर कितीही संघर्ष करण्याची आपली तयारी आहे. ज्यांना सत्ता असून, निधी आणता येत नाही त्यांनी साडेतीन वर्षात केवळ मी आणलेला निधी आडवण्याचेच काम केले आहे असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बीडच्या पालकमंत्र्यांना लगावला आहे.

परळी तालुक्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या विकास दौर्‍यात शनिवारी सायंकाळी धनंजय मुंडे यांनी नागापूर, नागपिंप्री, बोधेगाव या गावांमधील विकास कामांचा शुभारंभ केला. कार्यक्रमास तालुकाध्यक्ष अ‍ॅड. गोविंदराव फड, पं. स. सभापती मोहनराव सोळंके, उपसभापती पिंटु मुंडे, न. प. गटनेते वाल्मीकअण्णा कराड, जिल्हा सरचिटणीस माऊली गडदे, माजी उपसभापती विष्णुपंत देशमुख, नितीन कुलकर्णी, प्रकाश कावळे, प्रभुअप्पा तोंडारे, माणिकदादा सोळंके, भागवत मुंडे, युवक तालुकाध्यक्ष संतोष शिंदे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना ना. धनंजय मुंडे म्हणाले की, केंद्रात आणि राज्यातील सत्ता असलेल्या आणि दोन खात्यांचे मंत्रीपद असलेल्या लोकप्रतिनिधीकडून मतदार संघात कायापालट होईल अशी अपेक्षा होती, मात्र हे काम इथल्या लोकप्रतिनिधींना कधीच करता आले नाही. मात्र सत्ता नसतांना मी आणलेला निधी आडवण्याचे काम मात्र त्यांना चांगले जमते असा टोला लगावला. यापूर्वीही नगरपालिकेतील निधी आडवण्याचे काम केले आणि आता ग्रामीण भागात आडवा-आडवी सुरू आहे. आपल्याला याचा योग्यवेळी जाब विचारायचा आहे आणि मतपेटीतून तो आपण विचारावा असे आवाहन त्यांनी केले. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या विकास दौर्‍यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या कार्यक्रमास बोधेगावचे सरपंच श्रावण बनसोडे, उपसरपंच मंजाहरी गडदे, चेअरमन प्रल्हाद शिंदे, उध्दव पवार, देविदास पवार, धोंडीराम ढवाण, चंद्रकांत शिंदे, अशोक गडदे, बापुराव बनसोडे, सोपानराव गडदे, देविदास बनसोडे, सखाराम गडदे, शेख अमिर, राजाभाऊ कोपनर, राजाभाऊ गडदे, दत्ता थिटे, किसन सावरे, सोपान आबा, नागपिंप्रीच्या सरपंच रेखाताई भोसले, उपसरपंच सुषमा मुंडे, यशवंत भोसले, नामदेव राठोड, चेअरमन बालासाहेब मुंडे, निर्मलाताई भोसले, उषाताई आदमाने, धर्मराज आदमाने, डॉ. बालासाहेब भोसले, श्रीमंत मुंडे, सिध्दार्थ आदमाने, पंडीत भोसले, बाबुराव भोसले, धनराज मुगले, साहेबराव मुंडे, कारभारी जाधव, महादेव राठोड, यशवंत आदमाने, नागापूरचे बालासाहेब सोळंके, शिवाजी सोळंके, नामदेव बनसोडे, भागवत मुंडे, शेख गुलाब, माणिकराव सोळंके, गंगाराम सोळंके, प्रभुअप्पा तोंडारे, विकास मुसळे, दत्तात्रय गिरी, राम गायके, सखाराम बनसोडे, अनिस अन्सारे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.