Home » माझा बीड जिल्हा » नीट परीक्षेत विजय हांगे महाराष्ट्रात दुसरा.

नीट परीक्षेत विजय हांगे महाराष्ट्रात दुसरा.

नीट परीक्षेत विजय हांगे महाराष्ट्रात दुसरा.
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाइन
पाटोदा येथील वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी विजय हांगे याने नुकत्याच झालेल्या मेडीकल नीट परीक्षेत 720 पैकी 620 मार्क घेऊन एन.टी.डी.प्रवर्गातुन महाराष्ट्रात दुसरा क्रमांक पटकावुन यश संपदान केले आहे.
वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाटोदा येथील विद्यालयातील दरवर्षी विद्यार्थी मेडीकल परीक्षेत (नीट) यश संपादन करीत असुन शासकीय मेडीकल कॉलेजला किमान 2 ते 5 विद्यार्थी प्रविष्ठ होत आहेत. त्याच प्रमाणे याच विद्यालयाची माजी विद्यार्थीन कु.क्रांती सुनिल जाधव या विद्यार्थीनीने मेडीलक नीट परीक्षेत 720 पैकी 535 गुण घेऊन शासकीय मेडीलक कॉलेज प्रविष्ठ होत आहे.
वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इ.5 वी पासुनच 10 वी, 12 वी पर्यंत राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धापरीक्षा सातत्याने घेण्यात येत असुन शासनाच्या एन.डी.एस.सी.,एन.एम.एम.एस., शिष्यवुत्ती, नवोदय, व विद्यालयाअंतर्गत पी.टी.एन.टी.एस., राज्यर्षी छत्रपती शाहू महाराज दरमहा स्पर्धापरीक्षा घेऊन स्पर्धापरीक्षेची तयारी करण्यात येत असल्यानेच विद्यार्थी स्पर्धापरीक्षेच्या सरावामधुन तयारी करीत आहेत. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच इतर उपक्रम राबवुन ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्याबरोबर स्पर्धा करण्यासाठी विद्यालयाच्या पातळीवर परीपूर्ण विद्यार्थी बनविण्यामध्ये विद्यालय आघाडीवर आहे. विजय नवनाथ हांगे व क्रांती सुनिल जाधव यांनी मिळविलेल्या यशाबद्दल विद्यालयात नुकताच दोन्ही विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला असुन पुढील शिक्षणासाठी विद्यालयाच्या वतीने शुभेच्छ देण्यात आल्या आहेत. अभुतपुर्व मिळविलेल्या यशाबद्दल नवनिर्माण शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव रामकृष्ण बांगर, मार्गदर्शिका सत्यभामाताई बांगर,विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम तुपे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.