Home » राजकारण » ना.पंकजा मुंडेंकडे आ.धोंडे यांची मागणी.

ना.पंकजा मुंडेंकडे आ.धोंडे यांची मागणी.

ना.पंकजा मुंडेंकडे आ.धोंडे यांची मागणी.
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाइन
आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील रस्ते विकास गेल्या चार वर्षांपासून
आ.भीमराव धोंडे यांच्या माध्यमातून सुरू असुन मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंर्तगत आष्टी, पाटोदा , शिरुर या तालुक्यातील वाडी, वस्ती व लहाण गावांच्या रस्त्यांना मंजुरी देण्याबाबतची मागणी ग्रामविकासमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचेकडे आ.भीमराव धोंडे यांनी केली आहे.
आ.भीमराव धोंडे यांनी आष्टी मतदारसंघातील रस्ते विकासाचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न केंद्रीय रस्तेविकास मंत्री ना.नितिन गडकरी ग्रामविकासमंत्री ना.पंकजाताई मुंडे बांधकाममंत्री ना.चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून प्रमुख रस्त्यांचा मार्गी लावला आहे.पण लहाण गावे, वाड्यांच्या रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे. अनेक वर्षांपासून या गावांना कच्चा रस्ता सुध्दा नाही. म्हणुनच आ.भीमराव धोंडे यांनी जवळपास 47 वाडी , वस्ती रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंर्तगत मंजुरी देण्याची मागणी राज्याच्या ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांचेकडे केली आहे.

आष्टी तालुका
——————-
केरुळ -शेलारवाडी-कोहीणी-ते रामा 70 रस्ता , रा.मा.70 ते पांगरारस्ता, लोणी ते साकतरस्ता, दौलावडगाव-चिचेवाडी ते तागडखेल ते प्र.जि.मा.रस्ता, दौलावडगाव-केळ ते रा.मा.222 रस्ता , आष्टा-भातोडी ते जामखेड सरहद , प्र.जि.मा. 3 ते भवरवाडीरस्ता , धामणगाव ते महाजनवाडी-लाटेवाडीरस्ता , डोईठाण ते धनगरवाडीरस्ता, वाघळुज ते वाघळुज तांडा रस्ता ,रा.मा. 16 ते कापशीरस्ता , रा.मा. 16 ते पिंप्रीघाटा रस्ता ,
रा.मा. 70 ते बडेवाडीरस्ता , मातकुळी ते जरेवाडी ते तालुका सरहद , रा.मा.70 ते चिखली-दैठणा ते नाकी रस्ता , प्रजिमा 2 इमनगाव ते हनुमंतगाव ते दैठणारस्ता , ब्रम्हगाव-कासेवाडी-आंबेवाडी रस्ता , आष्टी-शेकापूर-बीडसांगवीरस्ता ,करंजी-भाळवणी-पांगुळगव्हाण रस्ता कडा – डोंगरगण रस्ता ते पिपरखेड रस्ता

पाटोदा तालुका
———————

पारनेर ते कुटेवाडीरस्ता , रा.मा. 56 ते सौदाणारस्ता ,प्र.रा.मा.16 ते नाकाडेवाडीरस्ता , प्रजिमा 23 ते मेंगडेवाडीरस्ता , रा.मा. 56 ते गांधनवाडीरस्ता , रा.मा.56 ते घोलपवस्ती -धनगरजवळका रस्ता चिखली(श्रृगेरीफाटा) ते जोगदंडवाडी रस्ता , रामा 55 ते वाघाचा वाडारस्ता , रा.मा.62 ते गितेवाडी रस्ता रा.मा.62 ते बांगरवाडीरस्ता , नफरवाडी ते येवलवाडी रस्ता , डोंगरकिन्ही ते तुपेवाडी रस्ता , डोंगरकिन्ही ते रायतेवाडी रस्ता ,
डोंगरकिन्ही ते म्हस्केवस्ती रस्ता , डोंगरकिन्ही ते मांडवेवाडी रस्ता

शिरुर तालुका
——————–

सोलेवाडी जोडरस्ता , मातोरी ते धारेवाडी जोडरस्ता ,
एम.एच.222 ते शिंगारवाडी क्र.1व क्र.2 जोडरस्ता , वारणी ते शेरेवाडी जोडरस्ता ,लोणी ते शेरेवाडी जोडरस्ता , माळेवाडी जोडरस्ता ,बडेवाडी जोडरस्ता , भालकेश्वर मंदीर जोडरस्ता , केदारवस्ती जोडरस्ता , दहीवंडी जोडरस्ता , वारणी ते तामाववस्ती जोडरस्ता उखळवाडी ते
खोल्याचीवाडी जोडरस्ता , भिलारवस्ती जोडरस्ता या रस्त्यांची गरज असुन हे रस्ते तात्काळ मंजुर करावेत ज्यामुळे या गावांचा , वाड्याचा विकास होईल अशी मागणी आ.भीमराव धोंडे यांनी दि. दिलेल्या पत्रात म्हटले आहे ना.पंकजाताई मुंडे यांनी त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे संबंधितांना आदेश दिले असुन लवकरच या रस्त्यांना मंजुरी मिळुन ही कामे सुरु होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.