Home » ब्रेकिंग न्यूज » माजी उपजिल्हाप्रमुख चाटे यांचे दु:खद निधन.

माजी उपजिल्हाप्रमुख चाटे यांचे दु:खद निधन.

माजी उपजिल्हाप्रमुख चाटे यांचे दु:खद निधन.
डोंगरचा राजा / आँनलाईन
वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथील “पहाडी राजे” या नावाने ओळख असलेले दिवंगत नामदेव चाटे यांचे जेष्ठ सुपुत्र जयदेव चाटे वय ५० वर्ष यांचे काल दिनांक १६ जुन रोजी सायंकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान बीड येथे त्यांच्या राहत्या घरी दु:खद निधन झाले.
वडवणी तालुक्यात नव्हे तर जिल्हाभरात “पहाडी राजे” या नावाने परिचित असलेले बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिवंगत नेते नामदेव चाटे यांचे जेष्ठ सुपुत्र शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख जयदेव चाटे हे कणखर व तेवढेच मनमिळावु व जातीभेद न मानणारे व्यक्तीमत्व होते.वडिल नामदेव चाटे यांची हत्या झाल्यानंतर संपुर्ण कुटुंबाला सावरूण अधार देण्याचे मोठे काम जयदेव चाटे यांनी केले.शिवसेनेच्या माध्यातुन कार्यकर्त्यांचे मोठे जाळे त्यांनी निर्माण केले होते.त्यांच्याकडे संघटन कौशल्य असल्यामुळे तालुक्यात व जिल्हाभरात मोठा मित्रपरिवार आहे.यावेळी शिवसेनेचे माजी आमदार सुनिल धांडे,नवनाथ शिराळे,प्रा.सोमनाथ बडे,सुनिल माने,सोमनाथ माने,सतिष पाटील,शिवसेनेचे विनायक मुळे,बाबरी मुंडे,दादासाहेब मुंडे,बाबासाहेब उजगरे,अनिल वाघमारे भास्कर उजगरे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत बीड तालुक्यातील पिंपळनेर जवळील बोरदेवी याठिकाणी त्यांच्या शेतात आज दुपारी १२-३० वाजता त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलं,दोन मुली,भाऊ,बहीण असा मोठा परिवार आहे.
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””'”””””””””””
मृत्युपुर्वी केला असंख्य मित्रांना संपर्क.
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””गेल्या कित्येक वर्षापासुन बीड येथील त्यांच्या राहत्या घरी एका जागेवर असेलेले जयदेव चाटे यांनी अनेक वर्षापासुन दुरावलेल्या त्यांच्या मित्रपरिवाराला मोबॉईल द्वारे संपर्क करून आस्थेवाईकपणे चौकशी केली.एेरव्ही सर्वांशी संपर्कात असलेले जयदेव चाटे अजारपणामुळे घरीच होते.परंतु जुन महिन्यात अनेक मित्रांना त्यांनी संपर्क केला होता.अंत्यविधीवेळी संपर्क केल्याची चर्चा होती.
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””

Leave a Reply

Your email address will not be published.