पावसाळ्यात आजाराबाबत सतर्क रहा -डाँ. घुबडे
डोंगरचा राजा / आँनलाईन
— आरोग्य कर्मचारी ग्रामसेवक मुख्याध्यापक यांनी सर्तक रहावे.
— आरोग्य शिक्षण ग्रामपंचायत विभागाचे नागरिकांना आव्हान.
— शुध्द व पाणी उकळून पिण्याचा सल्ला.
— घरोघरी शनिवार कोरडा दिवस पाळावा.
— एकदिवसीय कार्यशाळा संपन्न.
पाऊसळ्यातील दूषित पाण्यामुळे आतिसार गॅस्ट्रो काॅलरा हे जलजन्य आजार मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनी सर्तक राहावे तसेच आजारी रूग्णाला योग्य उपचार करावे आशी सुचना तालुक्यातील आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधिकारी आरोग्य कर्मचारी शिक्षण विभाग ग्रामपंचायत यांच्या विशेष कार्यशाळा बैठकीत जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी आमोल येडगे यांच्या सुचनेनुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ मधुकर घुबडे यांनी दिल्या आहेत.
जलजन्य व किटकनाशके आजार यावर प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी केवळ आरोग्य विभागाचेच काम नसून हे कार्य अति महत्त्वाचे असल्याने यामध्ये गटविकास अधिकारी गटशिक्षणाधिकारी यांच्या विभागाचाही समावेश महत्त्वाचा आहे. ग्रामीण भागातील जनतेचा सहभाग आवश्यक आहे. ग्रामपंचायत ने ग्रामपातळीवर जलनि:सारण,तुंबलेल्या नाल्या वाहत्या करणे ,खड्डे बुजविणे , उकीरडे नष्ट करणे ,घनकचरा व्यवस्थापन करणे पाण्याच्या साठ्यात गप्पी मासे सोडणे व घरात डास अळी नाशक साठी प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागाने एकञीत कार्य करून पाऊसळ्यातील आजारावर सर्तक राहण्याच्या सुचना एकदिवसीय कार्यशाळेत तालुका अधिकारी डॉ मधुकर घुबडे यांनी दिल्या आहेत.
यावेळी गटशिक्षणाधिकारी एम बी पटेल , वैद्यकीय अधिकारी डॉ उषा बांगर , विस्तार अधिकारी राऊत, जि एस जाधव , मुख्याध्यापक, आरोग्य अधिकारी कर्मचारी, ग्रामसेवक , महिला कर्मचारी उपस्थित होते. जलजन्य आजारावर वेळीच उपचार झाले नसल्यास गंभीर स्वरुपात आजार फैलावतो. पाऊसळ्यातील आजार टाळण्यासाठी पिण्याचे पाणी उकळवून आणी गाळून प्यावे जेवणापूर्वी स्वच्छ हात धुवणे उघड्यावरील अन्न पदार्थ खावू नये .गॅस्ट्रो आजार हा वेगवेगळ्या प्रकारच्या जिवाणूच्या प्रसारामुळे होत असतो यात प्रथम उलट्या आणी जुलाब एकाच वेळी सुरु होतात आतिसार हा आजार जिवाणू आणी विषाणू मुळे होतो यात प्रामुख्याने जुलाब होतात या आजाराची काळजी करण्यासाठी ओआरएस चे पाणी रूग्णांना द्यावे .ग्रामीण भागातील नळयोजनेच्या पाईपलाईन हातपंप विहीरीचा परिसरात अस्वच्छता आढळून आल्यावर तात्काळ उपाययोजना करून परिसर स्वच्छ करावा वैयक्तिक स्वच्छता कडे लक्ष द्यावे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी व आरोग्य कर्मचारी यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना निरोगी आरोग्य ठेवण्यासाठी सल्ला देऊन आजाराबाबत सर्तक राहावे असे आव्हान करण्यात आले.