परिवर्तनवादी स्वाभिमानी लढयाचे साक्षीदार व्हा – तांगडे
डोंगरचा राजा / आँनलाईन
— जिल्हाभरातील १ लाख लोक उपस्थित राहणार
बीड– रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने बीड शहरात शुक्रवार दि.29 जून रोजी दुपारी ठिक 12 वाजता युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष पप्पु कागदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बहूजनांच्या न्याय हक्कासाठी व खालील मागण्याच्या पुर्ततेसाठी आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे,परिवर्तन वादी स्वाभिमानी लढयाचे साक्षीदार बनून या आक्रोश मोर्चास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रिपाइंचे बीड तालुका अध्यक्ष किशन तांगडे यांनी केले आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या आक्रोश मोर्चामध्ये विविध मागण्या सरकार दरबारी मांडण्यात येणार आहेत. यामध्ये भिमा कोरेगांव दंगलीचा मुख्य सुत्रधार संभाजी भिडे यास अटक करण्यात यावी. अॅस्ट्रासिटी कायद्यात कसलाच बदल न करता तो अधिक कडक व प्रभावी करण्यात यावा.कसत असलेल्या गायरान जमिनी नावे करण्याच्या विरोधात काढण्यात आलेला शासन निर्णय रद्द करण्यात यावा. एल्गार परिषदेच्या आयोजकांवर दाखल करण्यात आलेले नक्षलवादी गुन्हे मागे घेण्यात यावेत. भटक्या-विमुक्तांसाठी रेणके आयोगाची शिफारस लागु करण्यात यावी. देशभरातील दलित-मुस्लीम यांवर अन्याय-अत्याचार करणार्या समाज कंठकांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच मातंग व चर्मकार समाज बांधवांवर अन्याय-अत्याचार करणार्या गावगुंडांवर कठोर कारवाई करण्यात यावी. महात्मा फुले महामंडळासह सर्व महामंडळांना भरिव निधी देण्यात यावा. रमाई-आवास घरकुल योजनेसाठी असलेली ग्रामपंचायत ठरावाची अट रद्द करण्यात यावी. या मागण्यांच्या पुर्ततेसाठी बीड येथे शुक्रवार दि.29 जून रोजी काढण्यात येणार्या आक्रोश मोर्चामध्ये सच्चे भीमसैनिक,रिपाइं पदाधिकारी, कार्यकर्ते, गायरान धारक, घरकुल धारक, महिला विद्यार्थी यांनी हजारोच्या संख्येने आक्रोश मोर्चात सामील व्हावे. असे आवाहन रिपाइंचे बीड तालुका अध्यक्ष किशन तांगडे यांनी केले आहे.