Home » राजकारण » तुम्ही मला साथ द्या – मोहनराव जगताप

तुम्ही मला साथ द्या – मोहनराव जगताप

तुम्ही मला साथ द्या – मोहनराव जगताप
रविकांत उघडे / डोंगरचा राजा

खतगव्हान येथील माजी सरपंचासह माजी चेअरमन मित्र मंडळात

माजलगाव – तालुक्यातील खतगव्हान येथील माजी सरपंच माणिकराव बुरंगे माजी चेअरमन भास्कर बुरंगे,माजी सरपंच भरत पायघन,ग्रा. सदस्य मंचक बुरंगे व गौतम बुरंगे यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांनी मोहनराव जगताप यांच्या उपस्थितीत मित्र मंडळाच्या जनसंपर्क कार्यलय याठिकानी प्रवेश केला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक एकनाथराव डाके हे होते.प्रमुख उपस्थिती सिद्धेश्वर बँकेचे माजी चेअरमन सुरेशराव एरंडे, माजी जि.प.सदस्य बबनराव सरवदे,संचालक माणिक राठोड,प्रकाशराव उजगरे,न.प.बांधकाम सभापती तथा तालुकाध्यक्ष शरद यादव,शहराध्यक्ष फेरोजभाई इनामदार, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष हितेंद्र काळे देपेगावकर, सर्कल अध्यक्ष विजयराव शेजुळ,युवा नेते रामेश्वर पठाडे,सिद्धेश्वर डाके,युवा नेते धनंजय काळे, विनोद गोपाळ, सय्यद जमिलभाई,प्रदीप चाळक, राहुल वाघमारे,अंकुश शिंदे हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना मोहनराव जगताप म्हणाले शेतकऱ्याला सुखी समाधानाचे दिवस यावे यासाठी माझे वडील व मी संघर्ष करत आलो.शेतकऱ्यांचे दुःख काय आहेत याची जाणीव आम्हाला आहे. छत्रपती कारखान्याच्या माध्यमातून अनेक हिताचे योजना राबवून मतदार संघातील बळीराजाला सुखाचे दिवस आणण्यासाठी पुर्णपणे प्रयत्नशील राहील.मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या कामासाठी मला हाक द्या मी सदैव तुमच्या पाठीशी राहील. या कार्यक्रमात खतगव्हान येथील माजी सरपंच माणिकराव बुरंगे,माजी सरपंच भरत पायघन, माजी चेअरमन से. सो.भास्करराव बुरंगे,ग्रा.सदस्य मंचकराव बुरंगे,मा. ग्रा.सदस्य गौतमराव बुरंगे,प्रल्हाद बुरंगे,सखाराम बुरंगे, हरिश्चंद्र बुरंगे,नवनाथ बुरंगे, बालासाहेब बुरंगे, चेतन बुरंगे, योगेश बुरंगे, गणेश बुरंगे,पद्माकर बुरंगे, कृष्णा बुरंगे, तुकाराम बुरंगे, अर्जुनराव बुरंगे,विजय बुरंगे,दादासाहेब बुरंगे यांनी प्रवेश केला.तसेच शिवसेनेचे युवा नेते दादा गरड यांनी प्रवेश केला.सर्वांचे हार,शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद यादव यांनी केले तर आभार हितेंद्र काळे देपेगावकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.