Home » राजकारण » शिवसेना महिला आघाडी काढणार बांगडी मोर्चा – सौ.माळी.

शिवसेना महिला आघाडी काढणार बांगडी मोर्चा – सौ.माळी.

शिवसेना महिला आघाडी काढणार बांगडी मोर्चा – सौ.माळी.
डोंगरचा राजा / आँनलाईन.

— प्रभाग ३,४,५ मध्ये रोगराईचे थैमान.
— पिण्याचे पाणी, रस्ता मिळेल का ?

वडवणी शहरामधे वार्ड प्रभाग क्रमांक ३.४.५. मध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून पिण्यासाठी पाणी नाही तसेच दळणवळणाच्या रस्त्यावर पावसाचे व सांडपाणी आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे संबंधितांना अनेकवेळा माहीती देऊनही दुर्लक्ष केले जात आहे.या प्रमुख प्रश्नांची तातडीने सोडवणूक करावी अन्यथा या प्रभागातीला महीलांना सोबत घेऊन आपल्या कार्यालयावर बांगडी मोर्चा काढला जाईल असा गंभीर इशारा शिवसेनेच्या महिला आघाडी तालुका प्रमुख सौ.प्रमिला माळी ओतारी यांनी दिला आहे.
वडवणी शहरातील प्रभाग क्रमांक ३.४.५ मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पिण्यासाठी पाणी सोडले जात नाही व कुठल्याही पर्यायी व्यवस्था केलेल्या नाहीत याबाबतीत अनेकांकडुन पिण्यासाठी पाणी सोडण्याची विनंती केली गेली परंतु त्याकडे दुर्लक्ष केले गेले. ३,४,५ या वार्डामध्ये कुठल्याही प्रकारे सोय नाही पावसाचे पाण्यामुळे नाल्या भरल्या त्यांची स्वच्छता नाही,अनेक दिवसापासून येथे दुर्गंधी पसरली आहे. मच्छरमुळे गेस्ट्रो, डेंग्यू मलेरीया अशा आजारात वाढ होत आहे.स्नानांसाठी, तसेच सांडपाणी व शौचास लागणारे पाणी हे तर सोडाच.येथे पिण्यासच पाणी मिळत नाही ही मोठी शोकांतीका म्हणावी लागेल वरील सर्व मागण्या बाबतीत मुख्याधिका-यांनी लक्ष वेधुन वेळीच उपाययोजना राबवाव्यात अन्यथा शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळुक, शिवसेना सह संपर्कप्रमुख संपदा गडकरी यांच्या आदेशानुसार व शिवसेना तालुका प्रमुख विनायक मुळें यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २६/६/२०१८ मंगळवार रोजी सकाळी ११ -०० वाजता प्रभाग ३,४,५ या वार्डातील सर्व महिलांना सोबत घेऊन नगरपंचायत कार्यालयावर बांगडी मोर्चा काढण्यात येईल
असा इशारा प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाव्दारे शिवसेनेच्या महिला आघाडी तालुका प्रमुख प्रमिलाताई माळी ओतारी यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.