पाटोद्यात मुसळधार पावसाची हजेरी.
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाइन
पाटोदा शहर व तालुक्यात शनिवारी दुपारपासुन पावसाने जोरदार हजेरी लावली असुन पाटोदा शहरासह थेरला रोहतवाडी या गावासह तालुक्यात अनेक ठिकाणी चांगला समाधानकारक पाऊस पडला या पावसामुळे गेल्या काही दिवसापासून रखड़लेल्या खरिपाच्या पेरण्या आता सुरु होणार असुन पेरण्याची चिंता आता मिटली आहे त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने दड़ी मारल्याने शेतकरी चिंतातुर होता तसेच तालुक्यात काही ठिकाणी पाणीटंचाई जाणवत होती मात्र आजच्या या जोरदार पावसाने सर्व समस्या दुर झाल्या असुन दुपारी सुरु असलेला हा पाऊस अजूनही सुरूच आहे आभाळ पूर्णपणे भरलेले असल्याने पाऊस आज रात्रभर सुरु राहण्याची शक्यता आहे