Home » माझी वडवणी » त्याचे..अन् सापा चेही प्राण वाचले.

त्याचे..अन् सापा चेही प्राण वाचले.

..त्यांचे आणि सापा चेही प्राण वाचले.
डोंगरचा राजा / आँनलाईन
— चावा घेतलेल्या जिवंत सापाला घेऊन ‘तो’ आला रुग्णालयात !

बीड : शहरातील काळा हनुमान ठाणा भागात राहणाऱ्या लखन गायकवाड याला आज सकाळी एका सापाने चावा घेतला. यानंतर निश्चित निदान होऊन डॉक्टरांना उपचार करण्यास मदत व्हावी म्हणून त्याने चावा घेतलेला साप चक्क हातात घेऊन तो जिल्हा रुग्णालयात दाखल झाला. त्याच्या हातात पाच ते सहा फूट लांबीचा साप त्याच्या हातात असल्याचे पाहून सुरूवातील डॉक्टर व नर्स घाबरल्या. मात्र, त्यानंतर लागलीच सावरत त्यांनी तरूणावर उपचार सुरू केले.

लखनच्या एका हातात साप व दुसऱ्या हाताला सलाईन असे चित्र पाहून प्रत्येकजण हैराण हित होता. परंतु, लखनच्या हातातील साप घेण्यास कोणी धजावेना. अखेर सर्प मित्र व पोलिस असलेले अमित मगर यांना फोन करून बोलावून घेण्यात आले. त्यांनी ततदिएन रुग्णालयात हजर होत लखनच्या हातातून साप काढून घेतला. तोपर्यंत अर्धा तासापेक्षाही अधिक काळ लखनने साप हातात धरून उपचार घेतले. सध्या लखनची प्रकृती व्यवस्थित आहे.

▪ सापालाही जीवदान :

कुठे साप दिसला तरी त्याला भीतीमुळे लोक मारून टाकतात. मात्र या प्रकरणात लाखां गायकवाड यांनी सापाने चावा घेतल्यानंतरही त्यास पकडून सुखरूप स्वतःसोबत रुग्णालयात आणले आणि सर्पमित्र आल्यानंतरच त्यांच्या हातात सोपविले. सध्या या सापाला एका बंद बरणीत ठेवण्यात आले आहे. कठीण प्रसंग ओढावूनही लखन गायकवाड यांच्या समयसूचकतेमुळे त्यांचे आणि सापाचे दोघांचेही प्राण वाचले.

Leave a Reply

Your email address will not be published.