Home » माझा बीड जिल्हा » २०१९ मध्ये रेल्वे इंजिनला हिरवा झेंडा – ना.मुंडे 

२०१९ मध्ये रेल्वे इंजिनला हिरवा झेंडा – ना.मुंडे 

२०१९ मध्ये रेल्वे इंजिनला हिरवा झेंडा – ना.मुंडे 
डोंगरचा राजा / आँनलाईन.
— चाचणी साठी नव्या रेल्वे इंजिनाची मागणी.
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विभागांच्या खाते प्रमुखांची आढावा बैठक घेतली त्यात प्रामुख्याने अहमदनगर-बीड – परळी लोहामार्गच्या काम बाबत रेल्वे अधिकाऱ्यांची आणि भूसंपादन साठी महसूल अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली त्यात आष्टी तालुक्यातील काही ठिकाणी प्रलंबित भूसंपादन प्रकरणे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. 2019 मध्ये रेल्वे इंजिन ला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी पूर्ण करावयाच्या विविध चाचण्यांसाठी नवीन रेल्वे इंजिन देण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पाठपुरावा करून नवीन इंजिन मिळवण्याचे आश्वासन दिले.

बीड जिल्ह्यातुन विविध राष्ट्रीय महामार्ग जात आहेत त्याचा जिल्ह्यातील अधिकारी व NHI च्या अधिकाऱ्यां समवेत संयुक्त आढावा घेतला, मंजूर 8 राष्ट्रीय महामार्गापैकी सर्वच राष्ट्रीय महामार्गाचे भूसंपादन 100% पूर्ण झाले आहे. तसेच मंजूर 190 किलोमीटर लांबी पैकी 120 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून त्याची टक्केवारी 90% एवढी आहे उर्वरित काम डिसेंबर 2018 अखेर पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. बीड जिल्ह्यातील इतर जिल्हा मार्गांची राज्य महामार्गामध्ये दरजोन्नती करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे ननिर्देश या वेळी पंकजा मुंडे यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published.