महावितरणचे एक पाऊल पुढे..
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाइन
— बिलासाठी मोबाईल व्हँन गावोगावी जाणार.
पाटोदा — महाराष्ट् राज्य विद्युत महावितरण कंपनीने आता एक पाऊल पुढे टाकले असुन मीटर रिडिंग एस एम एस विजबील एस एम एस ग्राहकाना तात्काळ मोबाईलवर कळते या सुविधेबरोबरच आता महावितरणने मोबाईल गाड़ी सुरु केली असुन ही गाड़ी विजबील भरून घेण्यासाठी असून ग्राहकाचे विजबील भरून घेऊन लगेच ऑनलाइन पावती देणार आहे, गावोगाव फिरणार आहे . अधिक माहिती अशी की ग्रामीण भागातील लोकांना विजबील भरण्यासाठी ग्रामीण भागातून शहरात यावे लागते अनेक ठिकाणी विजबील भरण्यासाठी सुविधा नाहीत, याचा विचार करुण महावितरणने आता मोबाईल व्हेन गाड़ी तयार केली असुन ही गाड़ी आता गावोगांव जाऊन ग्राहकाना विजबील भरण्यास मदत करणार आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील लोकांना यामुळे फायदा होणार महावितरणची ही वसुली होणार आहे प्रायोगिक तत्वावर बीड ज़िल्ल्यातून पाटोदा तालुक्यात या योजनेची सुरुवात केली असुन गेल्या दोन दिवसात पाटोदा ,वैद्यकिनी , पाचग्री, या ग्रामीण भागातील 74 ग्राहकाकडून तब्बल एक लाख रूपये विज बील भरून घेण्यात आले .या योजनेच्या उद्घटान प्रसंगी महावितरणचे बीड डिव्हीजनचे उपव्यवस्थापक रमाकांत उडानशिव, उपकार्यकारी अभियंता पाटोदा विजय भारबे यांच्यासह गोरे, वांढरे, वाघमारे ,देवगुडे जाधवर, पवार हे कर्मचारी उपस्थित होते